T20 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान, हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडियाचं बळकट स्थान

महिला क्रिकेट विश्वचषक टी-२० : पाकिस्तानशी आज लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 07:36 AM2018-11-11T07:36:47+5:302018-11-11T07:39:02+5:30

whatsapp join usJoin us
T20: India vs Pakistan, Harmanpreet led India to victory | T20 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान, हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडियाचं बळकट स्थान

T20 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान, हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडियाचं बळकट स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

प्रॉव्हिडेन्स(गयाना): सलामेीच्या सामन्यात शानदार विजय नोंदविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषक टी-२० त आज रविवारी पाकिस्तानाविरुद्ध होणाºया सामन्यात विजयाचा दावेदार मानले जात आहे. भारताला टी-२० क्रमवारीत जागतिक दर्जा दिला जात नसला तरी न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार हरमनप्रीत कौरने ५१ चेंडूत १०३ धावा फटकवून ३४ धावांनी विजय मिळवून दिला होता. ही लय कायम राखून पाकला नमविण्यास संघ सज्ज आहे. २०१६ मध्ये आपल्याच खेळपट्टीवर भारताला पाककडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते. त्यानंतर भारत आशिया चषकात पाकविरुद्ध तिन्हीवेळा खेळला आणि जिंकला.पाकला येथे पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून ५२ धावांनी पराभव पत्करावा लागला.

पाकविरुद्ध मानसी जोशी किंवा पूजा वस्त्रकार यांच्यापैकी एका वेगवान गोलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पाक संघात कर्णधार जावेरिया खान, अनुभवी फिरकीपटू सना मीर आणि अष्टपैलू बिसमाह मारुफ हे दर्जेदार खेळाडू आहेत. तथापि आॅस्ट्रेलियाकडून मिळालेले १५३ धावांचे लक्ष्य गाठताना पाकची फलंदाजी ढेपाळली होती.

उभय संघ
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मानधना, तानिया भाटिया, एकता बिश्त, डायलन हेमलता, मानसी जोशी, वेदा कृष्णमूर्ती, अनुजा पाटील, पूनम यादव, मिताली राज, अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार आणि राधा यादव.
पाकिस्तान : जावेरिया खान (कर्णधार), एमान अन्वर, आलिया रियाज, अनम अमीन, आयेशा जफर, बिसमाह मारूफ, डायना बेग, मुनीबा अली, नाहिदा खान, नास्रा संधू, नतालिया परवेज, निदा दार, सना मीर, सिद्रा नवाज आणि उमेमा सोहेल.

सामना : भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० पासून.

Web Title: T20: India vs Pakistan, Harmanpreet led India to victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.