Join us

टी-२० क्रिकेट : भारताचे लक्ष्य मालिका विजय, आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी लढत आज

सलग विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज (मंगळवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाºया दुसºया टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीत मालिका विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:35 IST

Open in App

गुवाहाटी : सलग विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज (मंगळवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाºया दुसºया टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीत मालिका विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. एसीए बारसापारा स्टेडियममध्ये हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना राहील.आतापर्यंत भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान मर्यादित षटकांची मालिका एकतर्फी ठरली आहे. वन-डे मालिकेत विराट कोहली अँड कंपनीने ४-१ ने विजय मिळवला. रांचीमध्ये पावसाच्या व्यत्ययानंतर पहिल्या टी-२० लढतीत भारताने ९ गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.भारताने आतापर्यंत आॅस्ट्रेलियाविरुद्ध १४ टी-२० सामन्यांपैकी १० सामने जिंंकले आहेत. त्यात सलग ७ सामने जिंंकण्याची कामगिरी केली. भारताने २८ सप्टेंबर २०१२ नंतर आॅस्ट्रेलियाविरुद्ध एकही टी-२० सामना गमावलेला नाही. आॅस्ट्रेलियन फलंदाजांना भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव व चहल यांच्या माºयाला सामोरे जाताआलेले नाही. या दोघांनी चार वन-डे व एक टी-२० सामन्यांत एकूण १६ बळी घेतले आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी भारतीय संघाच्या विजयात सूत्रधाराची भूमिका बजावली आहे. आॅस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे; पण तरी ते अपयशी ठरले, ही आश्चर्याची बाब आहे.दुसºया बाजूचा विचार करता भारतीय संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी केली आहे. रांचीमध्ये हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह महागडे ठरत असताना यादव व चहल यांनी धावगती नियंत्रणात राखली.आम्हाला आमच्या पद्धतीनेक्रिकेट खेळावे लागेल : वॉर्नर-1आमचे मनोधैर्य खचले नसून भारताविरुद्ध विद्यमान टी-२० मालिकेत संघाला मुसंडी मारण्यासाठी आॅस्ट्रेलियन पद्धतीने खेळावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे ते आॅस्ट्रेलियाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने.2एकदिवसीय मालिकेत १-४ फरकाने पराभूत झाल्यानंतर तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतही आॅस्ट्रेलिया संघ ०-१ ने पिछाडीवर आहे. मालिकेच्या दुसºया सामन्याच्या उंबरठ्यावर वॉर्नर म्हणाला, ‘आम्हाला मैदानावर उतरून चांगली कामगिरी करावी लागेल आणि स्वत:चे शंभर टक्केसमर्थन करावे लागेल.’प्रतिस्पर्धी संघ-भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, मनीष पांडे, एम. एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, आशिष नेहरा, दिनेश कार्तिक, के. एल. राहुल व अक्षर पटेल.आॅस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जासन बेहरेंडोर्फ, डॅन ख्रिस्टियन, नॅथन कुल्टर नाईल, अ‍ॅरोन फिंच, ट्रेव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अ‍ॅडम जम्पा, मार्क्स स्टोइनिस, अ‍ॅण्ड्र्यू टाय.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाटी-२० क्रिकेट