Join us

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : हिशोब चुकता करणार, पाकिस्तान Super 4 मध्ये भारताला नमवणार - शाहिद आफ्रिदी

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights :  भारत-पाकिस्तान यांच्यात आज आणखी एक महामुकाबला होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 18:24 IST

Open in App

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights :  भारत-पाकिस्तान यांच्यात आज आणखी एक महामुकाबला होणार आहे. सुपर ४ मधील लढतीत भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता आणि त्याची परतफेड करण्यासाठी बाबर आजमचा संघ सज्ज आहे. पण, आजचा सामना पाकिस्तान जिंकेल अन् हिशोब चुकता करेल, असा दावा शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) केला आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानला १४७ धावा करता आल्या होत्या आणि प्रत्युत्तरात रवींद्र जडेजा व हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ केला. हार्दिकने ३ विकेट्स व नाबाद ३३ धावांची खेळी करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण, आता जडेजाने दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात आफ्रिदीने मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला, पाकिस्तानचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. फिरकीपटूंची कामगिरी, जलजगती गोलंदाजांची कामगिरी तुम्ही पाहा. प्रत्येक गोष्टीत ते वरचढ आहेत. त्यामुळे आम्ही न जिंकण्यामागे असं कोणतंच कारण नाही. सुपर ४ मध्ये आम्ही हिशोब चुकता करू.''  

आफ्रिदीने यावेळी त्याचा जावई शाहिन शाह आफ्रिदीबाबतही मत व्यक्त केले. तो म्हणाला, शाहिन आफ्रिदी दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर गेल्याचा संघावर परिणाम झाला नाही. तो जखमी झाल्याने वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी बेंच स्ट्रेंथला आजमावण्याची संधी मिळाली.   

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानशाहिद अफ्रिदी
Open in App