Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : रोहित शर्मा संतापला, रिषभ पंत अन् हार्दिक पांड्याला झापलं! फोटो व्हायरल 

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली या अनुभवी खेळाडूंनी महत्त्वाच्या लढतीत आपला दम दाखवला. भारताला १८१ धावांचा टप्पा गाठून दिला.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 21:51 IST2022-09-04T21:50:48+5:302022-09-04T21:51:18+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Captain Rohit Sharma wasn't happy with Rishabh Pant and Hardik Pandya's dismissals. | Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : रोहित शर्मा संतापला, रिषभ पंत अन् हार्दिक पांड्याला झापलं! फोटो व्हायरल 

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : रोहित शर्मा संतापला, रिषभ पंत अन् हार्दिक पांड्याला झापलं! फोटो व्हायरल 

India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight :  रोहित शर्मा ( Rohit Sharma)  व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी भारताला स्फोटक सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहलीची ( Virat Kohli) बॅट तळपली. त्याने ४४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार मारून ६० धावा चोपून भारताचा अडखडलेला डाव सावरला. रिषभ पंतहार्दिक पांड्या आज अपयशी ठरले अन् त्यांना रोहितने झाप झाप झापले...   

रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पहिल्याच षटकात आपला इरादा दाखवून दिला. या दोघांनी ४.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या.  रोहित १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांत माघारी परतला. ८ धावांच्या अंतराने लोकेश ( २८) माघारी परतला. सूर्यकुमार यादव व विराट कोहलीने डाव सावरला होता, परंतु षटकार मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार ( १३) झेलबाद झाला. विराट व त्याने २९ धावांची भागीदारी केली. रिषभ पंतला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, पंरतु तो १४ धावा करून शादाबच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. विराट आज चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने ३६ चेंडूंत ट्वेंटी-२०तील ३२वे अर्धशतक झळकावले. त्याने रोहितचा ३१ अर्धशतकांचा विक्रम मोडला. दीपक हुडाने काही सुरेख फटके मारले, परंतु तो १६ धावांवर बाद झाला. विराटसह त्याने २४ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी केली. रवी बिश्नोईने अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार खेचून भारताला ७ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली. 


प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून चांगली सुरूवात पाहायला मिळाली, परंतु आज संधी मिळालेल्या रवी बिश्नोईने भारताला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकात त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (  १४) याला रोहितकरवी झेलबाद केले. बाबर माघारी जात असताना मैदानावरील अम्पायरने त्याला थांबवले व नो बॉल तपासायला लागला. पाकिस्तानी चाहत्यांना करिष्म्याची अपेक्षा होती, परंतु बिश्नोईने टाकलेला चेंडू वैध होता अन् पाकिस्तानला २२ धावांवर पहिला धक्का बसला. 
 

 

Web Title: T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Captain Rohit Sharma wasn't happy with Rishabh Pant and Hardik Pandya's dismissals.