Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : भारत-पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होणार? टॉस कधी होणार? कुठे पाहता येणार?; जाणून घ्या डिटेल्स

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सामना आज दुबईत रंगणार आहे. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यानंतर प्रथमच कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 03:52 PM2022-08-28T15:52:02+5:302022-08-28T15:52:23+5:30

whatsapp join usJoin us
T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : TOSS at 7PM, Where to Watch India vs Pakistan on TV, Online, and Live Streaming Details, know all details  | Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : भारत-पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होणार? टॉस कधी होणार? कुठे पाहता येणार?; जाणून घ्या डिटेल्स

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : भारत-पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होणार? टॉस कधी होणार? कुठे पाहता येणार?; जाणून घ्या डिटेल्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Pakistan Live Match Highlight : भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सामना आज दुबईत रंगणार आहे. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यानंतर प्रथमच कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आले आहेत. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर प्रथमच विजय मिळवण्याचा पराक्रम केला होता. पण, त्यानंतर भारतीय संघात बरेच बदल झाले आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ आणखी बलवान झाला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या पराभवाची आज भारत परतफेड करेल, अशीच अनेकांना अपेक्षा आहे.

  • आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात प्रथमच लढत होतेय. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत उभय संघांमध्ये झालेल्या १४ लढतींपैकी ८ मध्ये भारताने बाजी मारली आहे,  तर ५ लढती पाकिस्तानने जिंकल्या आहेत. १ लढत अनिर्णीत राहिली. पण, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर उभय संघ प्रथमच समोरासमोर येत असल्याने जास्त हवा झाली आहे. Ind vs Pak Highlight
  • दुबईत आतापर्यंत ७५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात आले आणि धावांचा पाठलाग करताना ३९ वेळा संघ जिंकला आहे. दव फॅक्टरमुळे येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे जाते आणि दुबईत प्रथम फलंदाजी करताना १४३ या सरासरी धावा आहेत.  त्यामुळे नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.  Ind vs Pak 2022 Match Highlight

कोणत्या देशात कोणत्या चॅनेलवर पाहू शकता आशिया चषक?

  • भारत- स्टार स्पोर्ट्स, Disney+Hotstar, DD SPORTS 
  • पाकिस्तान - PTV Sports, Ten Sports, Daraz आणि Tapmad
  • बांगलादेश - Gazi TV (GTV) / Total Sportsवर फिड शेअर केले जाणार
  • ऑस्ट्रेलिया - Fox Sports
  • न्यूझीलंड - Sky Sports
  • दक्षिण आफ्रिका - SuperSport network
  • अमेरिका, कॅनडा, नॉर्थ अमेरिका मार्केट - Willow TV
  • लंडन - Sky Sports Network
  • मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका -  OSN Sports Cricket HD
  • अफगाणिस्तान - Ariana TV
  • कॅरेबियन - Flow TV
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उपखंडीय युरोप, मलेशिया, जपान, दक्षिण पूर्व आशिया - Yupp TV  

 

  •  सामन्यांची वेळ - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ( नाणेफेक - सायंकाळी ७ वाजता) 

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंह, आवेश खान.  

पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह,  शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
 

Web Title: T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : TOSS at 7PM, Where to Watch India vs Pakistan on TV, Online, and Live Streaming Details, know all details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.