Join us  

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : दिनेश कार्तिकसह दोन खेळाडूंच्या निवडीवर गौतम गंभीरचा आक्षेप; केलं मोठं विधान 

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभ पंतला बाकावर बसवून दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळालीय संधी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 7:23 PM

Open in App

Ind Vs Pakistan Live Match Highlight : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना निम्मी लढाई जिंकली आहे.  दुबईत आतापर्यंत ७५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात आले आणि धावांचा पाठलाग करताना ३९ वेळा संघ जिंकला आहे. दव फॅक्टरमुळे येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे जाते आणि त्यामुळे नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय... कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) आजच्या सामन्यात रिषभ पंत खेळणार नसल्याचे जाहीर करताच सर्वांना धक्का बसला. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर भारताचा माजी कर्णधार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने नाराजी व्यक्त केली आहे. 

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड!पाकिस्तानविरुद्धचा हा सामना विराटचा १००वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना आहे आणि क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये १००+ सामने खेळणारा तो जगातील दुसरा व भारताचा पहिला खेळाडू ठरणार आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने हा पराक्रम प्रथम केला आहे. विराटने १०० ट्वेंटी-२०, १०२ कसोटी व २६२ वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रोहित शर्मा याच्यानंतर ( १३२ सामने) भारताकडून १०० ट्वेंटी-२० सामना खेळणारा विराट दुसरा खेळाडू आहे.  विराटने ९९ सान्यांत ५०.१२ च्या सरासरीने ३३०८ धावा केल्या आहेत.  त्यात ३० अर्धशतकांचा समावेश आहे.  १०२ कसोटीत विराटने ४९.५३च्या सरासरीने ८०७४ धावा केल्या आहेत, तर २६२ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ५७.६८च्या सरासरीने १२३४४ धावा आहेत. विराटने एकूण ७० आंतरराष्ट्रीय शतकं व १२२ अर्धशतकं झळकावली आहेत.

भारताची प्लेइंग इलेव्हन... ( India Playing XI) रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्षदीप सिंग ( Rohit Sharma (C), KL Rahul, Virat Kohli , Suryakumar Yadav, Dinesh Karthik (WK), Hardik Pandya, Yuzvendra Chahal, Bhuvneshwar Kumar, Ravindra Jadeja, Avesh Khan, Arshdeep Singh) 

गौतम गंभीर काय म्हणाला?रिषभ पंतला वगळून दिनेश कार्तिकच्या निवड केल्याचे आश्चर्य वाटतेय.. भारतीय संघा अनेक राईट हँडेड फलंदाज आहेत. मी रिषभ  पंतची निवड केली असती. कार्तिक व रवींद्र जडेजा यांच्या जागी मी रिषभ व दीपक हुडा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले असते, असे गौतम गंभीर म्हणाला. 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानदिनेश कार्तिकरिषभ पंतगौतम गंभीर
Open in App