Join us

T10 League: 16 चेंडूत 74 धावा, अफगाणी फलंदाजाची आतषबाजी, 4 षटकांत जिंकला सामना

T10 : क्रिकेटमध्ये सर्वात जलद खेळीचा विषय निघाला की एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, युवराज सिंग ही नाव हमखास समोर आलीच पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 12:25 IST

Open in App
ठळक मुद्देअफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादची फटकेबाजी16 चेंडूंत नाबाद 74 धावा, 8 षटकार व 6 चौकारराजपूत संघाने अवघ्या चार षटकांत जिंकला सामना

शारजा : क्रिकेटमध्ये सर्वात जलद खेळीचा विषय निघाला की एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, युवराज सिंग ही नाव हमखास समोर आलीच पाहिजे. त्यांची चौकार- षटकारांची आतषबाजी चाहत्यांच्या मनाला तृप्त करणारी, तर प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारी. या स्फोटक खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानच्या फलंदाजाचे नाव आले आहे. अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने 16 चेंडूत 74 धावा चोपण्याचा पराक्रम बुधवारी केला. विशेष म्हणजे या फटकेबाजीने त्याचा संघाने अवघ्या चार षटकांत विजय साजरा केला. आशिया चषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजांसाठी डोकदुखी ठरलेल्या शहजादने T10 क्रिकेटमध्ये बुधवारी धुवाधार खेळी केली. T10 च्या दुसऱ्या सत्रातील पहिल्याच दिवशी अशा खेळीचा आस्वाद घेता आला याचा क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला. शहजादने 16 चेंडूंत 74 धावा करताना राजपूत संघाला दहा विकेट राखून विजय मिळवून दिला. त्याने 74 धावांच्या खेळीत आठ उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांची आतषबाजी केली. त्याने अवघ्या 12 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सिंधी संघाने सलामीच्या सामन्यात 10 षटकांत 6 बाद 94 धावा केल्या. कर्णधार शेन वॉटसनने 20 चेंडूंत 42 धावांची खेळी साकारली. त्यात 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. भारताच्या मुनाफ पटेलने 20 धावांत 3 विकेट घेतल्या. 94 धावा उभ्या केल्यानंतर सिंधी संघाने मोहिम फत्ते असल्याचे समजले, परंतु शहजादने त्यांच्या विजयाच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. त्याने पहिल्याच षटकात तीन चौकार व एक षटकार खेचून एकूण 20 धावा केल्या. पुढच्या षटकार राजपूतचा कर्णधार ब्रेंडन मॅकलम् याने बॅटवर हात मोकळे केले. तिसऱ्या षटकात शहजादने श्रीलंकेच्या थिसारा परेराच्या गोलंदाजीवर तीन षटकार व 3 चौकार खेचले. त्यानंतर शहजादने चौथ्या षटकात सामना संपवला. मॅकलमने 8 चेंडूंत 21 धावा केल्या.पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :टी-10 लीगअफगाणिस्तान