दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मान्यतेने होणाऱ्या टी-10 लीगचा थरार आजपासून दुबईत रंगणार आहे. जगातील दिग्गज खेळाडू सहभागी होणार असल्यामुळे या लीगची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हे लीगचे दुसरे सत्र असून 12 दिवस 8 संघांमध्ये 29 सामने रंगणार आहेत.
स्पर्धेचा उद्धाटनीय सामना सिंधी संघ विरुद्ध राजपूत संघ यांच्यात होणार आहे. पहिल्या लीगपेक्षा यंदा संघांची संख्या दोनने वाढून आठ झाली आहे. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
या लीगमध्ये ख्रिस गेल, ब्रेंडन मॅकलम, इयॉन मॉर्गन, जोफ्रा आर्चर, कॉलीन मुन्रो, रशीद खान, शेन वॉटसन, शाहिद आफ्रिदी, झहीर खान, किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, लसिथ मलिंगा, सुनील नरीन आदी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.