T-20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, देशाच्या कानाकोपऱ्यात सध्या क्रिकेटचीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, क्रिकेटमध्ये असे काही नियम आहेत, जे आपण पाहतो, पण त्यामागचा अर्थ आणि कारण अनेकांना माहीत नसते. त्यापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे LBW निर्णयात वापरला जाणारा ‘अंपायर्स कॉल’.
काय असतो ‘अंपायर्स कॉल’?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका स्पोर्ट्स एक्सपर्टने ‘अंपायर्स कॉल’ची संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज LBW (Leg Before Wicket) आहे की नाही, हे ठरवताना अनेकदा ऑन-फिल्ड अंपायरचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. काही प्रसंगी निर्णय स्पष्ट नसल्यास DRS (Decision Review System) चा वापर केला जातो.
तज्ज्ञांच्या मते, फलंदाज LBW ठरण्यासाठी बॉलचा 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाग विकेटच्या लाईनमध्ये पिच होणे आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाग स्टंपला लागण्याची शक्यता असणे आवश्यक असते. जर DRS मध्ये हे स्पष्टपणे दिसत असेल, तर ऑन-फिल्ड अंपायरचा निर्णय काहीही असला तरी फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते.
50 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास काय होते?
मात्र जर बॉलचा 50 टक्क्यांपेक्षा कमी भाग विकेटच्या लाईनमध्ये पिच होत असेल किंवा स्टंपला लागण्याची शक्यता कमी असेल, तर निर्णय ‘अंपायर्स कॉल’वर अवलंबून राहतो. याचा अर्थ असा की, जर ऑन-फिल्ड अंपायरने आउट दिले असेल, तर तो निर्णय कायम राहतो. जर अंपायरने नॉट आऊट दिले असेल, तर तो निर्णय बदलला जात नाही.
DRS पूर्णपणे अचूक नसल्याने हा नियम
तज्ज्ञांच्या मते, DRS मध्ये वापरली जाणारी बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञान ही प्रत्यक्ष चेंडूची दिशा नसून त्याचा अंदाज असतो. हा अंदाज कॅमेरा डेटा आणि संगणकीय विश्लेषणावर आधारित असतो. म्हणूनच बॉल ट्रॅकिंग 100 टक्के अचूक नसू शकते. या संभाव्य त्रुटीचा विचार करून 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाग स्टंपला लागण्याची खात्री असल्यासच तिसरा अंपायर निर्णय बदलतो. अन्यथा ऑन-फिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठेवला जातो.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
‘anikett.thakurr’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाईक करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले, खूप छान समजावून सांगितले. तर दुसऱ्याने लिहिले, आजच कळले, याआधी फक्त सामना पाहत होतो.
Web Summary : As T-20 fever grips, a sports expert simplifies 'Umpire's Call' in LBW decisions. It hinges on ball's contact with wicket line and stumps. DRS relies on ball-tracking tech, not exact direction. On-field call stands if less than 50% certainty.
Web Summary : टी-20 विश्व कप के बीच, एक खेल विशेषज्ञ LBW निर्णयों में 'अंपायर्स कॉल' को समझाते हैं। यह विकेट लाइन और स्टंप से गेंद के संपर्क पर निर्भर करता है। डीआरएस बॉल-ट्रैकिंग तकनीक पर निर्भर करता है, सटीक दिशा पर नहीं। 50% से कम निश्चितता पर ऑन-फील्ड कॉल मान्य।