Join us

टीम इंडिया या संघाविरोधात प्रथमच खेळणार टी-20 मालिका, वेळापत्रक जाहीर

दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक व्यस्त राहणार आहे. या वर्षाच्या मध्यावर भारतीय संघ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 17:32 IST

Open in App

मुंबई - भारत आणि आयर्लंडमध्ये या वर्षाच्या मध्यावर टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जून महिन्याच्या अखेरीस आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यातील पहिला टी-20 क्रिकेट सामना 27 जून रोजी खेळवण्यात येईल. तर दुसरा सामना 29 जून रोजी होईल. दोन्ही सामने डब्लीन येथे खेळवण्यात येतील. भारत आणि आयर्लंडच्या  संघांमध्ये आतापर्यंत केवळ एकमेव टी-20 सामना खेळला गेला असून, त्या सामन्यात भारताने बाजी मारली होती. मात्र दोन्ही संघांमध्ये  आतापर्यंत द्विपक्षीय टी-20 मालिका खेळवण्यात आलेली नाही. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस दोन्ही संघांमध्ये होणारी मालिका ही पहिलीच द्विपक्षीय मालिका असेल. याआधी भारतीय संघाने दोन वेळा आयर्लंडचा दौरा केला होता. मात्र त्यावेळी प्रत्येकी एक एकदिवसीय सामना खेळविण्यात आला होता. भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळविण्यात आले आहेत. त्यातील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. 

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघआयर्लंडक्रीडा