India vs South Africa T-20: भारतीय महिला पुनरागमनास उत्सुक, द. आफ्रिकेविरुद्ध लढत आज रंगणार

मिताली राजच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय संघाने दुसऱ्या लढतीत ९ गड्यांनी मिळविलेल्या विजयाचा अपवाद वगळता भारताला या मालिकेत सांघिक कामगिरी करण्यात अपयश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:56+5:302021-03-20T06:53:25+5:30

whatsapp join usJoin us
T-20: Indian women eager for return, The match against south Africa will be played today | India vs South Africa T-20: भारतीय महिला पुनरागमनास उत्सुक, द. आफ्रिकेविरुद्ध लढत आज रंगणार

India vs South Africa T-20: भारतीय महिला पुनरागमनास उत्सुक, द. आफ्रिकेविरुद्ध लढत आज रंगणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लखनौ : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिला संघ शनिवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. या मालिकेत वर्चस्व गाजविण्यासाठी भारतीय संघाला खेळाच्या प्रत्येक विभागात सरस कामगिरी करावी लागेल. (T-20: Indian women eager for return, The match against south Africa will be played today)

मिताली राजच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय संघाने दुसऱ्या लढतीत ९ गड्यांनी मिळविलेल्या विजयाचा अपवाद वगळता भारताला या मालिकेत सांघिक कामगिरी करण्यात अपयश आले. दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत फॉर्मात दिसला. पाहुणा संघ टी-२० मालिकेतही हाच फॉर्म कायम राखण्यास प्रयत्नशील राहील. 

भारतीय संघाची गेल्या वर्षभरातील ही पहिली मालिका होती आणि त्यासाठी संघ तयार नसल्याचे निदर्शनास आले. भारताने तिसऱ्या व चौथ्या वन-डेमध्ये आव्हानात्मक मजल मारली, पण पहिल्या व पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये फलंदाज अपयशी ठरले. भारताला युवा शेफाली वर्माची उणीव भासली. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करणारी ही १७ वर्षीय खेळाडू आता आघाडीच्या फळीत परतणार आहे. 

हरमनप्रीत आऊट
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत दुखापतीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नसल्याचे उपकर्णधार स्मृती मानधनाने शुक्रवारी स्पष्ट केले. हरमनप्रीतला बुधवारी पाचव्या एकदिवसीय सामन्यादरम्यान फलंदाजी करताना दुखापत झाली. टी-२० मालिकेतील पहिली लढत शनिवारी खेळली जाणार आहे.

Web Title: T-20: Indian women eager for return, The match against south Africa will be played today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.