SMAT 2025 : अर्जुन तेंडुलकरनं IPL इतिहासातील महागड्या गड्याला स्वस्तात तंबूत धाडलं; पण...

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अर्जुन तेंडुलकरची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:14 IST2025-12-02T12:08:33+5:302025-12-02T12:14:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Syed Mushtaq Ali Trophy 2025 Arjun Tendulkar Shines With 3 Wickets With IPLMost Expensive Player Venkatesh Iyer But He fails as opener for fourth Straight Match Goa vs Madhya Pradesh | SMAT 2025 : अर्जुन तेंडुलकरनं IPL इतिहासातील महागड्या गड्याला स्वस्तात तंबूत धाडलं; पण...

SMAT 2025 : अर्जुन तेंडुलकरनं IPL इतिहासातील महागड्या गड्याला स्वस्तात तंबूत धाडलं; पण...

Syed Mushtaq Ali Trophy 2025 Arjun Tendulkar Performance : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील चौथ्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरनं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठाच्या मैदानात रंग  मध्य प्रदेश विरुद्धच्या लढतीत अर्जुन तेंडुलकरनंगोवा संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. पण गोलंदाजीत धार दाखवल्यावर सलामीराच्या रुपात तो सलग चौथ्या सामन्यातही अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. इथं एक नजर टाकुयात अर्जुन तेंडुलकरच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील आतापर्यंतच्या कामगिरीवर.... 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अर्जुन तेंडुलकरनं IPL मधील महागड्या अन् स्फोटक फलंदाजाची शिताफीनं केली शिकार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गोवा संघाने अर्जुन तेंडुलकरला सलामीच्या रुपात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना अर्जुन तेंडुलकरनं आपल्या ४ षटकांच्या कोट्यात ३६ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या. मध्य प्रदेशचा सलामीवीर अनुकूल सिंगला अवघ्या ३ धावांवर तंबूचा रस्ता दाखवल्यावर   शिवांग कुमार या सलामीवीराला अर्जुनने खातेही उघडू दिले नाही. या दोघांशिवाय व्यंकटेश अय्यरच्या रुपात त्याने सामन्यात मोठे यश मिळवले. व्यंकटेश अय्यर हा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलच्या इतिहासातील तो तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. या स्टार खेळाडूला अर्जुन तेंडुलकरनं अवघ्या ६ धावांवर माघारी धाडले. 

SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका

गोलंदाजीत धार दिसली, पण...

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा संघ सोडून गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतलेल्या अर्जुन तेंडुलकर आगामी IPL हंगामात लखनौच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे. नव्या संघात त्याला किती संधी मिळणार? हा एक मोठा प्रश्नच आहे. दरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी  स्पर्धेत गोवा संघाने त्याला फलंदाजीत बढती दिल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून अर्जुन तेंडुलकर सलामीवीराच्या रुपात खेळताना दिसला. गोलंदाजीत धार दाखवून देण्यात तो यशस्वी ठरला. पण सलामीवीराच्या रुपात त्याच्या पदरी निराशाच आल्याचे पाहाला मिळाले. गोलंदाजीत ४ सामन्यातील २ सामन्यात विकेट लेस राहुन त्याने आपल्या खात्यात ६ विकेट जमा केल्या आहेत. पण फलंदाजीत मात्र ४ सामन्यातील ४ डावात त्याच्या खात्यात फक्त ६५ धावा आहेत. उत्तर प्रदेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने २८ धावा केल्या होत्या. ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. 

अर्जुन तेंडुलकरची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी

गोवा विरुद्ध उत्तर प्रदेश  

  • फलंदाजी- २२ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने १२७.२७ स्ट्राइक रेटसह २८ धावा 
  • गोलंदाजी-  २.२ षटकात २९ धावा खर्च करत विकेट लेस

गोवा विरुद्ध चंदीगड 

  • फलंदाजी-  ९ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने १५५.५६ स्ट्राइक रेटसह १४ धावा
  • गोलंदाजी- ४ षटकात १७ धावा खर्च करत  ३ विकेट्स

  
गोवा विरुद्ध हैदराबाद-

  • फलंदाजी- १३ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ५३.८५  स्ट्राइक रेटसह ७ धावा
  • गोलंदाजी-  २ षटकात १३ धावांसह विकेट लेस

गोवा विरुद्ध मध्य प्रदेश 

  • फलंदाजी- १० चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने १६० स्ट्राइक रेटसह १६ धावा
  • गोलंदाजी- ४ षटकात ३६ धावा देत ३ विकेट्स

Web Title : SMAT 2025: अर्जुन तेंदुलकर की गेंदबाजी में चमक, बल्लेबाजी में संघर्ष।

Web Summary : अर्जुन तेंदुलकर ने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में 3 विकेट लेकर प्रभावित किया, जिसमें महंगे आईपीएल खिलाड़ी वेंकटेश अय्यर का विकेट शामिल है। हालांकि, सलामी बल्लेबाज के रूप में वह संघर्ष करते दिखे और अपनी गेंदबाजी की सफलता को रनों में नहीं बदल पाए। 4 मैचों में उनका सर्वाधिक स्कोर 28 है।

Web Title : SMAT 2025: Arjun Tendulkar shines with ball, struggles with bat.

Web Summary : Arjun Tendulkar impressed with 3 wickets in the Syed Mushtaq Ali Trophy, dismissing expensive IPL player Venkatesh Iyer cheaply. However, he struggled as an opener, failing to convert his bowling success into runs. His highest score in 4 matches is 28.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.