Syed Mushtaq Ali Trophy 2024 Semi-Final Schedule : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. बुधावारी ११ डिसेंबरला कर्नाटक असोसिएशनच्या दोन वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात आलेल्या चार सामन्यातून उपांत्य फेरीतील चार संघ ठरले आहेत. एक नजर टाकुयात मुंबईसह सेमी फायनलमधील चार संघ आणि पुढच्या फेरीतील सामन्यांच्या वेळापत्रकावर
उपांत्यपूर्व फेरीतील सामने अन् निकाल (Quarter-Final Results)
SMAT 2024-25 उपांत्यपूर्व फेरीत चारही सामने अगदी रंगतदार झाले. क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघानं हार्दिक पांड्याच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर बंगालच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करत सेमी फायनल गाठली. दुसऱ्या सामन्यात मध्य प्रदेशच्या संघानं सौराष्ट्रच्या संघाने ठेवलेल्या १७० धावांचा पाठलाग करताना ६ विकेट्स राखून पराभवर करत सेमीच तिकीट बूक केले. श्रेसय अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघानं अजिंक्य रहाणे आणि पृथ्वीशॉसह अखेरच्या षटकात शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे याने केलेल्या फटकेपाजीच्या जोरावर २२२ धावांचा टार्गेट पार करत विदर्भ संघाला स्पर्धेबाहेर करत सेमीत धडक मारली. दिल्लीच्या संघानं अनुज रावतच्या ७३ धावांच्या जोरावर भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशला स्पर्धेतून बाहेर करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
SMAT 2024 सेमी-फायनल संघ (Semi-Final Teams)
बडोदा हा सेमीत एन्ट्री मारणारा पहिला संघ ठरला. त्याच्यापाठोपाठ मध्य प्रदेश, मुंबई आणि दिल्ली संघाने सेमीची जागा पक्की केली. या चार संघात मुंबईचा संघ सर्वात भारी आहे. यामागचं कारण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ हा अनुभवी आणि युवा आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंनी भरलेला आहे. अन्य संघाच्या तुलनेत या संघात सर्वाधिक तगड्या आणि स्टार खेळाडूंचा भरणा दिसून येतो. भारतीय टी-२० संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवही या संघाचा भाग आहे. या गोष्टी मुंबई संघाला अन्य स्पर्धकांपेक्षा भारी ठरवणाऱ्या आहेत.
कुठं अन् कधी रंगणार उपांत्य फेरीचे सामने? (SMAT 2024 Semi-Finals Venue And Time)
उपांत्य फेरीतील दोन्ही लढती या बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नियोजित आहेत. हे सामने शुक्रवारी (१३ डिसेंबर) रोजी खेळवण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यातील सामन्याने उपांत्य फेरीतील लढतींना सुरुवात होईल. संध्याकाळी ४:३० वाजता दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातील सामना खेळवण्यात येणार आहे.