Baroda vs Bengal, Quarter Final 1 : पांड्या बंधूच्या बडोदा संघानं एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात बंगालच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना बडोदा संघाकडून हार्दिक पांड्यासहक्रुणाल पांड्याच्या पदरी निराशा आली होती. पण हार्दिक पांड्यानं बॅटिंगमधील कसर बॉलिंगमध्ये भरून काढत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
बंगालचा संघ १३१ धावांत ऑल 'आउट'
पहिल्यांदा बॅटिेग करताना बडोदाच्या संघानं निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या होत्या. त्यानंतर हार्दिक पांड्या, लुकमान मेरीवाला आणि अतित शेठ यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत बंगालच्या संघाला १८ व्या षटकात १३१ धावांत ऑल आउट केलं. या तिघांशिवाय अभिमन्यू राजपूतनं एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.
बडोदा संघाकडून एकाच्याही भात्यातून आली नाही फिफ्टी
बंगालच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एम चिन्नास्वामी मैदानावर रंगलेल्या या सामन्यात बडोदाच्या संघाकडून हार्दिक पांड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण ना तो चालला ना त्याचा भाऊ आणि संघाचा कॅप्टननं धावा काढल्या. हार्दिक पांड्या ११ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. क्रुणाल पांड्याला तर दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. त्याने ११ चेंडूत फक्त ७ धावांची खेळी केली. बडोदा संघाकडून एकालाही मोठी खेळी करत फिफ्टीचा डाव साधता आला नाही. सलामीवीर शास्वत रावतनं २६ चेंडूत ४० धावांची जी खेळी केली ती संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली.त्याच्यापाठोफाट दुसरा सलामीवीर अभिमन्यू सिंग याने ३४ चेंडूत ३७ धावा केल्या. निर्धारित षटकात संघाचा डाव ७ बाद १७२ धावांपर्यंत पोहचला. बंगालच्या संघाकडून मोहम्मद शमीसह कनिश्क सेठ आणि प्रदीप्ता यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. सक्षम चौधरींनं आपल्या खात्यात एक विकेट जमा केली.
बंगालच्या ताफ्यातून फिफ्टी आली, पण ती व्यर्थ ठरली
बंगालकडून अभिषक पोरेल २२( १३) रितविक चॅटर्जी २९ (१८) या दोघांशिवाय शाहबाज अहमदनं दुहेरी आकडा गाठला. त्याने ३६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. त्याने या सामन्यात सर्वोच्च धावसंख्या उभारली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे त्याच अर्धशतक व्यर्थच ठरलं. हार्दिक पांड्याने या सामन्यात पहिल्या षटकात १० पेक्षा अधिक धावा खर्च केल्या. पण उर्वरित तीन षटकात जबरदस्त कमबॅक करताना त्याने २७ धावा खर्च करून ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी संघाचा सेमीचा मार्ग सोपा करण्यासाठी उपयुक्त ठरली.