SMAT 2024 : टेन्शन फ्री अन् जबाबदार कॅप्टन! Rajat Patidar नं पुन्हा दाखवली ताकद

मध्य प्रदेशकडून त्यानं केलेली ही कामगिरी आयपीएलमध्ये RCB च्या कॅप्टन्सीच्या शर्यतीतही रजतसाठी उपयुक्त ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 19:14 IST2024-12-15T19:10:46+5:302024-12-15T19:14:28+5:30

whatsapp join usJoin us
Syed Mushtaq Ali Trophy 2024 Final Rajat Patidar Unbeaten on 82 off 40 balls mumbai vs madhya pradesh | SMAT 2024 : टेन्शन फ्री अन् जबाबदार कॅप्टन! Rajat Patidar नं पुन्हा दाखवली ताकद

SMAT 2024 : टेन्शन फ्री अन् जबाबदार कॅप्टन! Rajat Patidar नं पुन्हा दाखवली ताकद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Syed Mushtaq Ali Trophy 2024 Final Rajat Patidar Unbeaten Fifty : मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीची फायनल लढत बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगली आहे. अंतिम सामन्यात संघातील अन्य सहकाऱ्यांनी नांगी टाकल्यावर कॅप्टन रजत पाटीदार शेवटपर्यंत लढला. त्याने ४० चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळत लढवय्या खेळी तर केलीच. पण दबावात कॅप्टन्सी करताना भात्यातून दमदार खेळी करण्याची धमकही दाखवून दिली. त्याच्या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशच्या संघानं निर्धारित २० षटकात धावफलकावर ८ विकेट्सच्या मोबदल्यात १७४ धावा लावल्या. 

६ चौकार अन् ६ षटकारांसह बहरलेल्या खेळीनं संघाला दिला आधार

मध्य प्रदेशच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना ५४ धावांवर ४ विकेट्स गमावल्या त्यावेळी रजत पाटीदार मैदानात उतरला होता. एका बाजून ठराविक अंतराने विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूनं रजत पाटीदार नुसता मैदानात तग धरून उभा राहिला नाही. तर त्याने आपल्या खेळीत तुफान फटकेबाजीचा नजराणाही पेश केला. २८ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घालणाऱ्या रजतनं शेवटपर्यंत मैदानात थांबून ८२ बहुमूल्य धावा करताना ६ खणखणीत चौकारांसह तेवढेच गगनचुंबी षटकारही मारले. 

रजत शिवाय कुणाचाच लागला नाही निभाव


 
रजत शिवाय शुभ्रांशू सेनापती (२३ धावा) हरप्रीत सिंह भाटिया, (१५ धावा), व्यंकटेश अय्यर (१७) आणि राहुल बॉथमनं केलेल्या १९ धावा वगळता अन्य कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि रेस्टन डियास यांनी प्रत्येकी २-२ तर अथर्व अंकोलकर, शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली.

स्पर्धेत  सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर  

यंदाच्या स्पर्धेत रजत पाटीदार याने विशेष छाप सोडलीये. १० सामन्यातील ९ डावात पाच अर्धशतकासह त्याने ४२८ धावा कुटल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्य रहाणे पाठोपाठ तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशकडून त्यानं केलेली ही कामगिरी आयपीएलमध्ये RCB च्या कॅप्टन्सीच्या शर्यतीतही रजतसाठी उपयुक्त ठरू शकते.

 

Web Title: Syed Mushtaq Ali Trophy 2024 Final Rajat Patidar Unbeaten on 82 off 40 balls mumbai vs madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.