Join us

विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)

अखेरच्या ओव्हरमध्ये ९ धावांची गरज असताना पडली हार्दिक पांड्याची विकेट, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 20:41 IST

Open in App

Vijay Shankar Direct Hit From The Deep To Run Out Hardik Pandya Watch Video : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बडोद्याचा संघ धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. भाऊ क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील हार्दिक पांड्या संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलताना दिसतो. देशांतर्गत या टी-२० स्पर्धेतील तमिळनाडू विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही हार्दिक पांड्याचा जलवा पाहायला मिळाला. तमिळनाडूच्या संघाने पांड्या बंधुच्या संघासमोर २२२ धावांचे टार्गेट सेट केले होते. 

पांड्यानं ३० चेंडूत कुटल्या ६९ धावा

 या धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने ३० चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ६९ धावांची दमदार खेळी केली. तो पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देऊन नॉट आउट पॅव्हेलियनमध्ये परतेल, असे वाटत होते. पण विजय शंकरनं त्याच्या तुफानी खेळीला ब्रेक लावला. या सामन्यात पांड्या डायरेक्ट थ्रोवर रन आउट झाल्याचे पाहायला मिळाले. 

मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्या आउट, पण..

अखेरच्या षटकात बडोदा संघाला ९ धावांची गरज होती. हार्दिक पांड्या मैदानात असल्यामुळे बडोदा संघ हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण २० व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या रन आउट झाला. विजय शंकरनं अगदी मोक्याच्या क्षणी पांड्याच्या रुपात संघाला मोठी विकेट मिळवून दिली. हार्दिक पांड्याच्या रुपात बडोदा संघाने गमावेली ही सातवी विकेट होती.

सामन्यात ट्विस्ट! अखेरच्या चेंडूवर बडोदा संघाला विजयासाठी आवश्यक होत्या ४ धावा 

पांड्याची विकेट पडल्यावर सामना अगदी रंगतदार अवस्थेत पोहचला होता. अखेरच्या चेंडूवर बडोदा संघाला विजयासाठी ४ धावांची गरज होती. पांड्या अडखळल्यावर संघही फसतोय की, काय असे चित्र निर्माण झाले होते. पण अतित सेठनं शेवटच्या चेंडूवर चौकार मारत संघाला  ३ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या स्पर्धेतील 'ब' गटात बडोदा संघ ३ पैकी ३ सामन्यातील विजयासह टॉपला आहे. हार्दिक पांड्या प्रत्येक सामन्यात संघासाठी बहुमूल्य योगदान देत आहे. सलग दुसऱ्या सामन्यात त्याने कडक फलंदाजी करत संघासाठी मॅच विनिंग खेळी केल्याचे पाहायला मिळाले.

 

टॅग्स :हार्दिक पांड्याटी-20 क्रिकेटक्रुणाल पांड्याविजय शिवणकर