Join us

सय्यद मुश्ताक अली क्रिकेट : कर्नाटक-तमिळनाडूत अंतिम सामना

अभिमन्यू मिथुन याने हॅट्ट्रिकसह एका षटकात घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर कर्नाटकने हरयाणावर आठ गड्यांनी मात करीत सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 06:48 IST

Open in App

सुरत : अभिमन्यू मिथुन याने हॅट्ट्रिकसह एका षटकात घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर कर्नाटकने हरयाणावर आठ गड्यांनी मात करीत सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. दुसऱ्या एका सामन्यात तमिळनाडूने राजस्थानला पराभूत करत अंतिम फेरी गाठली.मिथुनने शेवटच्या षटकात हरयाणाचे पाच फलंदाज तंबूत पाठवले. त्यामुळे हरयाणाचा डाव २० षटकांत आठ बाद १९४ धावांतच सीमित राहिला. मिथुनने प्रथम राणाला अग्रवालकरवी झेलबाद केले. त्यानंतरच्या चेंडूवर तेवाटियाला झेल देण्यास भाग पाडले. सुमीतला बाद करीत मिथुनने हॅट्ट्रिक पूर्ण केली. चौथ्या चेंडूवर अमित मिश्राला बाद केले, तर शेवटच्या चेंडूवर जयंत यादवला बाद करीत पाच बळी मिळविले. त्याने ३९ धावांत पाच बळी मिळविले. उत्तरादाखल कर्नाटकने १५ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १९५ धावा करीत सहज विजय साकारला.दुसºया उपांत्य सामन्यात तमिळनाडूने वॉशिंग्टन सुंदरच्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थावर मात केली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण देत तमिळनाडूने राजस्थानचा डाव नऊ बाद ११२ धावांतच रोखला. विजय शंकरने १३ धावांत दोन बळी घेतले. उत्तरादाखल तमिळनाडूने १७.५ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ११६ धावा केल्या. तिसºया क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५३ धावा केल्या. त्याने सलामीवीर रविचंद्रन अश्विन (३१) याच्या समवेत दुसºया विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. 

 

टॅग्स :भारत