Join us  

IND vs AUS: 'कॅप्टन सूर्या'ला आजच्या सामन्यात खुणावतोय मोठा पराक्रम; रोहित, विराटची बरोबरी करण्याची संधी

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा टी२० सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 11:43 AM

Open in App

Suryakumar Yadav IND vs AUS 3rd T20: क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव मौल्यवान असते. एक धावेने सामन्याचा निकाल बदलू शकतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सध्या भारताची टी२० मालिका सुरू आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया आघाडीवर आहे. या टी२० मालिकेतील तिसरा सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला एक मोठा विक्रम खुणावतोय. त्याने जर एक महत्त्वाची कामगिरी केली तर त्याचा समावेश विराट, रोहित आणि राहुलच्या पंगतीत होणार आहे.

सूर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याने वन डे मालिकेत फारशी चमक दाखवलेली नसली तर टी२० मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी आणि फलंदाजी दोन्ही विभागात तो चांगली कामगिरी करत आहे. या दरम्यान आज सूर्यकुमार यादवला ६० धावा करून एक महत्त्वाचा पराक्रम करण्याची संधी आहे. त्याने ६० धावा केल्यास त्याचे नाव अशा यादीत जोडले जाईल जेथे आजपर्यंत केवळ तीन भारतीय क्रिकेटपटूंची नावे नोंदवली गेली आहेत.

जर सूर्यकुमारने गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंवा पुढील दोन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६० धावा केल्या तर तो टी२० तील २ हजार धावांचा टप्पा गाठेल आणि असे करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये फक्त विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल या तिघांनीच अशी कामगिरी केली आहे.

विराट कोहली टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1 शतक आणि 37 अर्धशतकांसह 4008 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा विराटच्या अगदी मागे म्हणजेच दुसऱ्या स्थानावर आहे. 148 सामन्यात 3853 धावांसह, सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. केएल राहुल या यादीतील तिसरा भारतीय आहे, ज्याने 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2265 धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार अशोक यादवविराट कोहलीरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ