Suryakumar Yadav Wife Devisha Shetty On Dhanshree Verma : मोस्ट एंगेजिंग कोरियोग्राफर अन् प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा हिने नुकतेच एका पॉडकास्ट शोमध्ये क्रिकेटर युजवेंद्र चहलपासून विभक्त झाल्याच्या क्षणी काय अवस्था होती, त्याबद्दलची भावना धनश्री वर्मानं व्यक्त केलीये. त्यावर आता भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी चर्चेत आलीये. देविशानं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून धनश्रीबद्दल मनातली गोष्ट बोलून दाखवलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय म्हणाली होती धनश्री वर्मा? त्यावर देविशानं काय म्हटलंय?
चहलसोबतच्या नात्यातील दूराव्यानंतर धनश्री वर्मा पहिल्यांदाच वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळावर व्यक्त झाली. पॉडकास्ट शोमध्ये ती म्हणाली की, घटस्फोट होणार हे माहित असल्यामुळे मानसिकदृष्ट्या तयार होते. पण तो क्षण खूपच भावनिक होता. त्या दिवशी (घटस्फोट झाला तो दिवस) मी सर्वांसमोर हुंदका देत रडले. त्यावेळी मी जे अनुभवले ते शब्दांत सांगू शकतं नाही, असे म्हणत तिने आपले मन मोकळे केले. तिने शेअर केलेली ही गोष्ट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यावर देविशाने तुझ्यावरील प्रेम कायम आहे, असे सांगत तुझा आदर वाटतो, अशी मनातली गोष्ट बोलून दाखवलीये.
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
क्रिकेटपासून विभक्त झाल्यावर ट्रोल झालेली धनश्री
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील घटस्फोटाचा मुद्दा चांगलाच हॉट टॉपिक ठरला. दोघांच्यातील नात्यात दूरावा निर्माण झाल्याची गोष्ट समोर आल्यापासून सोशल मीडियावर काहींनी धनश्रीला ट्रोल केलं. तिने फक्त प्रसिद्धीसाठी क्रिकेटरशी लग्न केलं, अशा शब्दांत ती ट्रोल झाली. पण आता चहलचं वागणं अन् धनश्रीनं व्यक्त केलेल्या भावना यानंतर तिच्याबद्दल सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यात सूर्यकुमार यादवची पत्नी देविशाही मागे राहिलेली नाही.
चहलनं स्टंट केला, पण तिने मागच्या दारानं काढता पाय घेतला
कार्टात घटस्फोटाची अंतिम सुनावणी झाल्यावर युजवेंद्र चहलनं खास मेसेज लिहिलेला शर्ट घालून धनश्री वर्माला टोमणा मारला होता. यासंदर्भातली तिला विचारणा करण्यात आली. यावर ती म्हणाली, की तो पहिल्यांदा बाहेर पडला. टी शर्ट अन् मीडियासमोर जे घडलं त्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. कारण त्यावेळी मी आतच होते. जे घडलंय ते मनाला पटत नव्हते. त्यामुळे मी मागच्या गेटनं बाहेर पडले, असेही तिने सांगितले आहे.