भारतीय टी २० क्रिकेटमधील स्टार रिंकू सिंह लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. शाहरुखच्या संघाकडून क्रिकेटच्या मैदानात 'हिरो'गिरी करणारा रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत लगीन गाठ बांधणार असल्याची गोष्ट वाऱ्यासारखी पसरलीये. प्रिया सरोज यांचे वडील तूफानी सरोज यांनी या जोडीच्या लग्नाची बोलणी सुरु असल्याची गोष्ट कबुलही केलीये. एका बाजूला रिंकू सिंह आणि कमी वयात खासदारकी मिळवलेल्या चेहऱ्यांपैकी एक असलेल्या प्रिया सरोज यांची चर्चा रंगत असताना आता या दोघांत तिसरी व्यक्ती चर्चेत आलीये. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तो आहे भारतीय टी-२० संघाचा कॅप्टनस सूर्यकुमार यादव. युवा खासदार प्रिया सरोज यांच्या एका पोस्टमुळे सूर्यकुमार यादव पिक्चरमध्ये आलाय. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रिया सरोज यांनी खास कॅप्शनसह शेअर केलाय सूर्यकुमार यादवसोबतचा फोटो
खासदार प्रिया सरोज या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असल्याचे दिसून येते. त्यांची एक जुनी पोस्ट आता व्हायरल होत आहे. ज्यात भारतीय टीृ २० संघाचा विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रिया सरोज एका फ्रेमध्ये दिसत आहेत. प्रिया सरोज यांनी मागील वर्षी १७ ऑक्टोबरला सूर्यकुमार यादव याच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करताना प्रिया सरोज यांनी "सूर्या दादा" असा उल्लेख केल्याचेही दिसून येते.
प्रिया सरोज अन् सूर्यकुमार यादव यांच्या फोटोवरून तर्कवितर्कांना उधाण
रिंकू सिंह अन् युवा खासदार प्रिया सरोज ही जोडी जमल्याची चर्चा रंगली असताना आता सूर्यकुमार पिक्चमध्ये आल्यामुळे वेगवगेळ्या चर्चेलाही उधाण आले आहे. खासदार प्रिया सरोज यांनी सूर्यासोबत जो फोटो क्लिक केलाय तो नेमका कुठलं याची कोणतीही हिंट मिळत नसली तरी या फोटोतून प्रिया सरोज या क्रिकेटच्या अन् सूर्याच्या फॅन आहेत, ही गोष्ट स्पष्ट होते. एवढेच नाही तर रिंकू सिंहला त्या आधीपासून ओळखत असाव्यात असा अंदाजही काहीजण बांधत आहे. रिंकू हा सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत सातत्याने टीम इंडिकडून खेळताना दिसतोय. दोघांच्यात कमालीचे बॉडिंगही पाहायला मिळते. त्यामुळे फोटोमध्ये फक्त सूर्या दिसत असला तरी यात रिंकू कनेक्शन असावे, असेही काहींना वाटू शकते.