सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल ICC Award 2023 च्या शर्यतीत; जाणून घ्या समोर कोण 

ICC Award 2023 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने २०२३च्या पुरस्कारासाठीचे नामांकनं आज जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:27 PM2024-01-03T17:27:12+5:302024-01-03T17:27:43+5:30

whatsapp join usJoin us
Suryakumar Yadav nominated for ICC Men's T20I cricketer of the year 2023 & Yashasvi Jaiswal nominated for ICC Men’s Emerging Cricketer of the Year 2023 | सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल ICC Award 2023 च्या शर्यतीत; जाणून घ्या समोर कोण 

सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल ICC Award 2023 च्या शर्यतीत; जाणून घ्या समोर कोण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Award 2023   (Marathi News) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने २०२३च्या पुरस्कारासाठीचे नामांकनं आज जाहीर केली. भारताचा सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२०तील क्रिकेटपटूच्या, तर यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) हा इमंर्जिंग क्रिकेटपटूच्या शर्यतीत आहे. या भारतीय क्रिकेटपटूंसमोर पुरस्कारासाठी तगडे स्पर्धक आहेत.


सूर्यकुमारने २०२३ मध्ये ट्वेंटी-२०त १७ इनिंग्जमध्ये ४८.८६ च्या सरासरीने व १५५.९५च्या स्ट्राईक रेटने ७३३ धावा केल्या आहेत. २०२२ प्रमाणे सूर्याने मागील वर्षही गाजवले. २०२३च्या सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात त्याला श्रीलंकेविरुद्ध केवळ ७ धावा करता आल्या होत्या, परंतु त्यानंतर त्याने पुढील २ सामन्यांत अनुक्रमे ५१ ( ३६) व नाबाद ११२ ( ५१) अशी खेळी केली. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ४४ चेंडूंत ८३ धावा कुटल्या आणि विंडीज दौऱ्यावरील शेवटच्या लढतीत ४५ चेंडूंत ६१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघ त्याच्या नेतृत्वाखाली खेळला आणि मालिका जिंकली. सूर्याची ४२ चेंडूंतील ८० धावांची खेळी स्फोटक ठरली. वर्षाच्या शेवटी आफ्रिकेविरुद्ध त्याने ५७ धावांत शतक ठोकले.  

ICC Men’s T20I Cricketer of the Year 2023 shortlist
 ICC Men's T20I cricketer of the year 2023 पुरस्कारासाठी सूर्यासमोर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा ( ५१५ धावा व १७ विकेट्स) , न्य़ूझीलंडचा मार्क चॅम्पमन ( ५५६ धावा) व उगांडाचा अल्पेश रामजानी ( ५५ विकेट्स ) यांचे आव्हान आहे.  तेच Emerging Cricketerच्या पुरस्कारासाठी भारताच्या यशस्वी जैस्वालचे नाव आहे. यशस्वीने कसोटी क्रिेकटमध्ये ७०.७५च्या सरासरीने २८३ धावा केल्या, तर ट्वेंटी-२०त त्याने ४३० धावा केल्या आहेत. त्याच्यासमोर या पुरस्कारासाठी श्रीलंकेचा दिलशान मदुशंका ( वन डे १५ विकेट्स व ट्वेंटी-२० १२ विकेट्स), दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्झी ( कसोटी - १० विकेट्स, वन डे - ३१ विकेट्स व ट्वेंटी-२० - ६ विकेट्स) आणि न्यूझीलंडचा रचीन रवींद्र ( वन डे - ८२० धावा व १८ विकेट्स; ट्वेंटी-२०त ९१ धावा व ५ विकेट्स) यांचे आव्हान आहे.  

ICC Men’s Emerging Cricketer of the Year 2023 shortlist

Web Title: Suryakumar Yadav nominated for ICC Men's T20I cricketer of the year 2023 & Yashasvi Jaiswal nominated for ICC Men’s Emerging Cricketer of the Year 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.