Suryakumar Yadav Devisha Shetty Daughter Riddhima Name Meaning : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव नुकताच 'बापमाणूस' झाला आहे. ७ मे २०२६ रोजी सूर्यकुमार आणि देविशा शेट्टी यांनी बेबी गर्लच्या रुपात आपल्या पहिल्या अपत्याचं स्वागत केले. या जोडप्याने सोशल मीडियावरून आपल्या लेकीचे नाव ‘रिद्धिमा’ ठेवल्याची माहिती शेअर केली आहे. क्रिकेटरची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. इथं जाणून घेऊयात सूर्या-देविशानं लेकीच्या नावामागची अर्थपूर्ण गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्या-देविशाच्या लेकीचं बारसं; रिद्धिमा नावाचा अर्थ काय?
भारतीय संस्कृतीत नाव हे फक्त व्यक्तीची ओळख नसून त्यात व्यक्तिमत्व, संस्कार आणि संस्कृती या गोष्टींचा सुरेख मिलाफ दिसून येतो. रिद्धिमा या नावाचा अर्थ प्रेमाने परिपूर्ण, समृद्ध आणि आनंदी असा होतो. आपल्याकडे हे नाव सौंदर्य, प्रेम आणि भावनिक खोलीचे प्रतीक मानले जाते. करुणा, प्रेम आणि सौम्यतेचे मूर्त रूपही या नावात अधोरेखित होते. पारंपरिक संस्कार आणि समकालीन अभिव्यक्तीचा सुंदर संगम असल्यामुळे आधुनिक काळातही रिद्धिमा नावाची लोकप्रियता टिकून असल्याचे दिसते.
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
रिद्धिमा नावाची रास अन् बरंच काही
आद्याक्षरानुसार, 'रिद्धिमा' हे नाव तूळ राशीशी संबंधित आहे. ही रास संतुलन, सौंदर्य आणि कलात्मकतेचे प्रतीक मानली जाते. या राशीतील लोक न्यायप्रिय, सर्जनशील आणि मिळून मिसळून राहणारे असतात.
- राशी स्वामी ग्रह – शुक्र (प्रेम, सौंदर्य आणि संगीत)
- स्वभाव – आकर्षक, संतुलित, कलाप्रिय
- शुभ रत्न – हिरा किंवा ओपल
- सकारात्मक गुण – सौंदर्यदृष्टी, भावनिक संतुलन, शांत स्वभाव
लोकप्रिय सेलिब्रेटी कपल
सूर्यकुमार यादव आणि देविशा हे भारतीय सेलिब्रिटी कपलपैकी एक लोकप्रिय जोडपं आहे. २०१० मध्ये कॉलेजमध्ये झालेल्या पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्रीचं नातं फुललं. त्यानंतर काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली. आता ही जोडी पालकत्वाच्या नव्या जबाबदारीसाठी सज्ज झाली आहे.
Web Summary : Suryakumar Yadav and Devisha Shetty named their daughter Riddhima, born May 7, 2026. The name signifies love, prosperity, and happiness. It's linked to Libra, symbolizing balance and artistry.
Web Summary : सूर्यकुमार यादव और देविशा शेट्टी ने 7 मई, 2026 को जन्मी अपनी बेटी का नाम रिद्धिमा रखा। नाम प्रेम, समृद्धि और खुशी का प्रतीक है। यह तुला राशि से जुड़ा है, जो संतुलन और कलात्मकता का प्रतीक है।