भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसतोय. क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडून मोठा चाहतावर्ग कमावणारा सूर्या भाऊ हा अनेकदा फिल्डबाहेरील गोष्टींमुळेही लक्षवेधून घेताना दिसते. एका बाजूला आयपीएल स्पर्धा सुरु असताना दुसऱ्या बाजूला सूर्या अन् त्याची पत्नी देविशा यांच्या महागड्या शॉपिंगची गोष्ट चर्चेत आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्यासह पत्नी देविशाची महागडी शॉपिंग; अलिशान घरासाठी मोजले कोट्यवधी
क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडून तगडी कमाई करणाऱ्या सूर्या भाऊनं मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत अलिशान घर खरेदी केले आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार आणि देविशा या लोकप्रिय जोडीनं मुंबईतील चेंबूरजवळील देवनार येथील गोदरेज स्काय टेरेसेस प्रोजेक्टमध्ये दोन आलिशान अपार्टमेंटची खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीसाठी त्यांनी जवळपास २१.११ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मोजली आहे. ही रक्कम क्रिकेटला आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी मिळालेल्या पॅकेजपेक्षा अधिक आहे. मुंबई इंडियन्सच्या संघानं १६.३५ कोटींसह आपल्या संघात कायम ठेवले होते.
'एक से बढकर एक' फ्रेम'! मिस्टर ३६० Surya Kumar Yadav वर बायकोनं असं व्यक्त केलं प्रेम
दोन्ही अपार्टमेंट एकाच मजल्यावर
सूर्यकुमार यादवने खरेदी केलेल्या प्रॉपर्टीमधील एक अपार्टमेंट हे ३ बीएचके आणि एक अपार्टमेंट ४ बीएचके आहे. एकाच मजल्यावर असणाऱ्या दोन्ही अपार्टमेंटचा एकूण कार्पेट एरिया ४,२२२.७६ चौरस फूट इतके आहे. अलिशान घर खरेदीचा हा व्यवहार मार्चच्या सुरुवातीला झाला आहे. यातील एक अपार्टमेंट हे सूर्याच्या नावे तर एक अपार्टमेंट त्याची पत्नी देविशा यादव नावाने नोदणीकृत आहे.
सूर्यकुमार यादव नेटवर्थ
मीडिया रिपोर्टसनुसार, क्रिकेटर सूर्यकुमार यादव याचे २०२४ पर्यंतचे नेटवर्थ हे ५५ कोटी रुपये इतके आहे. क्रिकेटशिवाय वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीच्या माध्यमातून सूर्यकुमार यादव तगडी कमाई करतो. सध्या वास्तव्यास असलेल्या अलिशान घरासह आता त्याच्या प्रॉपर्टीत आणखी दोन महागड्या अपार्टमेंट्सची भर पडली आहे. त्यामुळे येत्या काळात त्याच्या नेटवर्थच्या आकड्यातही वाढ झाल्याचे दिसून येईल.