Join us  

Corona Virus : सुरेश रैनानं केलं सचिन तेंडुलकरपेक्षा अधिक दान

भारताचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैनानं शनिवारी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मदत केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 6:32 PM

Open in App

भारताचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैनानं शनिवारी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मदत केली. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, युसूफ व इरफान पठाण आणि गौतम गंभीर यांच्यानंतर कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पुढे आलेला रैना हा आणखी एक क्रिकेटपटू आहे. पण, रैनानं केलेली मदत ही भारताचा महान फलंदाज तेंडुलकरनं केलेल्या मदतीपेक्षा अधिक आहे.

नुकताच रैना आणि त्याची पत्नी प्रियांका यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला. सोमवारी त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. या कपलला 2016मध्ये मुलगी झाली होती आणि तिचं नाव गार्सिया असं ठेवण्यात आले होते. त्यानंतर 2020मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. त्यांनी त्याचं नाव रिओ असं ठेवलं आहे. कोरोना व्हायरमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  चेन्नई सुपर किंग्सने रैनाच्या कुटुंबीयातील नव्या सदस्याचे स्वागत केले.  

रैनानं नुकतीच ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानं 2018मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला होता. आगामी आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्यात त्याचा निर्धार आहे.  पण, त्यानं शनिवारी मोठी आर्थिक मदत केली. तेंडुलकरनं केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी 25 लाख म्हणजेच 50 लाखांची मदत केली. पण, रैनानं पंतप्रधान सहाय्यता निधी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अनुक्रमे 31 व 21 लाखांची अशी एकूण 52 लाखांची मदत केली आहे.    

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Salute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी

Video : कोरोना व्हायरसमुळे भयभीत आहात? DJ Bravoचं नवं प्रेरणादायी गाणं ऐका

Video : क्वारंटाईनमध्ये विराट-अनुष्का काय करतायत ते पाहा!

Corona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू

India Vs Corona: 10 श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी 'या' सहा जणांनी अजूनही दाखवलेली नाही मनाची श्रीमंती

MS Dhoni चा निवृत्तीचा निर्णय झाला पक्का, लवकरच घोषणा 

Video : घरी बसून 'हिटमॅन'ला काय काय करावं लागतंय? इंग्लंडच्या खेळाडूला सांगितली व्यथा

लॉकडाऊनमुळे भारतात अडकले न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक; शिकतायत हिंदी अन् कन्नड 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यासुरेश रैनासचिन तेंडुलकरसौरभ गांगुलीगौतम गंभीर