मुंबई : माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटूचे वेतन वाढविण्याच्या मागणीचे समर्थन करताना बीसीसीआयच्या वाढणा-या मिळकतीमध्ये खेळाडू हिस्सा मिळवण्याचे हकदार असल्याचे म्हटले आहे.
गांगुली म्हणाला,‘निश्चितच खेळाडूंना पैसा मिळायला हवा. बोर्डाची जर कमाई वाढली असेल तर त्यांनाही अधिक पैसा मिळायला हवा. विराट कोहलीला खेळताना पूर्ण देश बघतो.’
गांगुली पुढे म्हणाला,‘खेळाडूंची कारकीर्द छोटी असते. अनेक खेळाडू १५ वर्षे खेळू शकत नाहीत. २० वर्षे खेळणार फार मोजके खेळाडू असतात. त्यामुळे वेतन वाढण्याच्या मागणीचा मी समर्थक आहे. ’
गांगुलीने पुढे सांगितले की,‘बीसीसीआय खेळाडूंवर लक्ष देत आहे. खेळाडूंवर ज्याप्रमाणे लक्ष देण्यात येत आहे ते प्रशंसनीय आहे. ज्यावेळी १९९१ मी आॅस्ट्रेलिया दौºयावर गेलो त्यावेळी संपूर्ण दौºयातून मला ३० हजार रुपये मिळाले होते. २०१३ मध्ये ज्यावेळी मी कारकिर्दीला पूर्णविराम दिला त्यावेळी थोडा फरक झाला होता. असे प्रत्येक व्यवसायात होते.’ (वृत्तसंस्था)