भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याचा आज वाढदिवस. युवराजचा जन्म १२ डिसेंबर १९८१ रोजी चंदीगड येथे झाला. युवराज हा माजी भारतीय गोलंदाज योगराज सिंग यांचा मुलगा आहे.
एका विश्वकप स्पर्धेत ३०० धावा फटकावणारा पहिला अष्टपैलू खेळाडू.
२००७ मध्ये भारतीय वन-डे संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती
२०१४ मध्ये एफआयसीसीआयतर्फे मोस्ट इन्स्पायरिंग स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कराचा मानकरी.
लक्षवेधी कामगिरी :
२००७ मध्ये आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेतील सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम
२००० ते २०१७ या कालावधीत २६ वन-डे सामन्यात सामनावीर
२००५ ते २०११ या कालावधीत सातवेळा मालिकावीर
२०१३-१७ या कालावधीत सात टी-२० सामन्यात सामनावीर
२०१२ मध्ये भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
२०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव.
२०११ विश्वकप स्पर्धेत स्पर्धावीर पुरस्काराचा मानकरी.