सनरायझर्स इस्टर्न कॅप संघाने गुरूवारी दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२०त पार्ल रॉयल्सवर पाच विकेट्सने विजय मिळवून विजयी मालिका सुरू ठेवली आहे. या सामन्यात सनरायझर्सच्या विजयापेक्षा संघ मालकीण व आयपीएल क्रश काव्या मारन ( Kaviya Maran) हिचीच जादू पाहायला मिळाली. काव्या मारन भारताबरोबरच दक्षिण आफ्रिकेतही चर्चेत आली आहे. लाइव्ह मॅचदरम्यान एका दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्याने काव्या मारनला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि त्यावरून राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या पार्ल रॉयल्सनेही फिरकी घेतली. 
काव्या मारनचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत, हे या प्रसंगावरून दिसून आले. पार्लच्या बोलँड पार्कमध्ये सनरायझर्स इस्टर्न कॅप सामना सुरू असताना काव्या मारनवरील चाहत्याचे प्रेम जगासमोर आले. सनरायझर्स फ्रँचायझीच्या मालकीण काव्या मारन स्टँडमधून संघाची कामगिरी पाहत होत्या. जेव्हा कॅमेरा स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यावर फोकस केला. हा चाहता हातात बोर्ड घेऊन दिसला, ज्यावर लिहिले होते- काव्या मारन, तू माझ्याशी लग्न करशील का?
पार्ल रॉयल्सच्या डावाचे आठवे षटक पूर्ण झाल्यानंतर कॅमेरा एका चाहत्यावर केंद्रित झाला.  त्याच्या हातात एक बोर्ड होता, ज्यावर काव्या मारनसाठी लग्नाचा प्रस्ताव होता आणि हृदयाची इमोजी बनवली होती. चाहत्याच्या लग्नाचा प्रस्ताव SA20 ने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला. 
काव्या मारन ही सन नेटवर्कची मालक कलानिथी मारन यांची मुलगी आहे आणि T20 लीग फ्रँचायझी 
सनरायझर्स हैदराबाद आणि सनरायझर्स इस्टर्न कॅपची सह-मालक आहे. भारतात आयपीएल सामन्यांदरम्यान, चाहते काव्याबद्दल उत्सुक असतात. चाहत्यांनी काव्याला आयपीएलचा 'क्रश' मानले आहे.आयपीएल दरम्यान काव्या पहिल्यांदा कॅमेऱ्यांच्या नजरेत आली तेव्हा तिला 'मिस्ट्री गर्ल' म्हणून संबोधले गेले. तिच्या ओळखीनंतर ती आयपीएलची क्रश बनली आहे.   
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"