Join us  

IPL 2020 : लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद

RCB vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबच्या तडाख्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पालापाचोळा झाला

By स्वदेश घाणेकर | Published: September 25, 2020 12:48 PM

Open in App

RCB vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League 2020) गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) च्या तडाख्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचा पालापाचोळा झाला. KXIPचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) वादळी शतकी खेळी करताना RCBच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. KL Rahulने 69 चेंडूंत 14 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 132 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर KXIPने 3 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा संपूर्ण संघ 17 षटकांत 109 धावांत माघारी परतला. RCB vs KXIP Latest News & Live Score:

KXIPने हा सामना 97 धावांनी जिंकला. या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) एक धाव करून माघारी परतला आणि त्यावरून माजी क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी केलेल्या कमेंटवरून वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी या विधानात कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हीचा उल्लेख होता आणि त्यामुळे आता गावस्कर यांना समालोचकांच्या पॅनलवरून हटवण्याची मागणी होत आहे. RCB vs KXIP Latest News & Live Score

सुनील गावस्कर काय म्हणाले?सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या कमेंटने चाहते नाराज झाले आहेत. हिंदीत समालोचन करताना गावस्कर यांनी विराटच्या निराशाजनक कामगिरीवर म्हटले की,''विराटनं लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला.'' लॉकडाऊनमध्ये विराट-अनुष्काचा ( Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?) क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा संदर्भ देऊन गावस्कर यांनी हे विधान केलं असाव, परंतु त्यांच्या या विधानानं चाहते चांगलेच भडकले आहेत. गावस्करांच्या या विधानाचा अनेकांनी दुहेरी अर्थही लावला.

नेटिझन्सची टीका

राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले

राहुलनं शानदार शतक साकारत आज अनेक विक्रम मोडीत काढले. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम राहुलच्या नावावर जमा झाला आहे. हा विक्रम आधी डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. वॉर्नरनं २०१७ मध्ये हैदराबादचं नेतृत्त्व करताना १२६ धावांची खेळी साकारली होती. २०११ मध्ये विरेंद्र सेहवागनं दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना ११९ धावा केल्या होत्या. २०१६ मध्ये आरसीबीचं कर्णधारपद भूषवताना विराट कोहलीनं तीन शतकं (११९ धावा, १०९ धावा, १०८ धावा नाबाद) झळकावली आहेत. 

आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही आता राहुलकडे आहे. रिषभ पंतनं २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२८ धावांची खेळी केली होती. पंतचा विक्रम आज राहुलनं मोडीत काढला. पंतनंतर मुरली विजय (चेन्नईकडून खेळताना १२७ धावा), विरेंद्र सेहवाग (पंजाबकडून खेळताना १२२ धावा), पॉल वेल्थॅटी (पंजाबकडून खेळताना नाबाद १२० धावा) यांचा क्रमांक लागतो.

कर्णधार असताना आणि कर्णधार नसताना शतक साकारणारा चौथा खेळाडूआयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळत असताना आणि कर्णधार म्हणून खेळत नसताना शतक झळकावण्याची किमया आतापर्यंत केवळ दोन खेळाडूंना जमली होती. विरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर यांनाच ही कामगिरी जमली आहे. आता राहुलच्या नावावरही ही कामगिरी जमा झाली आहे.

टॅग्स :IPL 2020सुनील गावसकरविराट कोहलीअनुष्का शर्मारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकिंग्स इलेव्हन पंजाब