Join us

Sunil Gavaskar: हेटमायरच्या पत्नीबद्दल गावसकरांचे वादग्रस्त वक्तव्य

चेन्नईविरुद्ध हेटमायर मैदानावर आल्यावर क्रीजवर सेट होत असतानाच तो पहिला चेंडू खेळण्याआधीच गावसकर मजेदार वक्तव्य करण्याच्या नादात नको ते बोलून गेले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 09:35 IST

Open in App

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्स- राजस्थान रॉयल्स सामन्यात समालोचन करताना दिग्गज सुनील गावसकर नको ते बोलून गेले. त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. वेस्ट इंडीजचा खेळाडू शिमरोन हेटमायरच्या पत्नीबद्दल केलेले विधान मानहानिकारक असल्याचे सांगून चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले.

चेन्नईविरुद्ध हेटमायर मैदानावर आल्यावर क्रीजवर सेट होत असतानाच तो पहिला चेंडू खेळण्याआधीच गावसकर मजेदार वक्तव्य करण्याच्या नादात नको ते बोलून गेले. ‘मोठा प्रश्न हा आहे की, शिमरोन हेटमायरच्या पत्नीची नुकतीच डिलिव्हरी झाली, आता हेटमायर राजस्थान रॉयल्ससाठी डिलिव्हरी करू शकेल का?,’ असे गावसकर बोलले.  

गावसकर यांनी हेटमायच्या पत्नीचे बाळंतपण झाल्याचा संदर्भ देत डिलिव्हरी हा शब्द काहीतरी करून दाखवणे या अर्थाने  वापरण्याच्या नादात शब्द खेळ करीत हे वक्तव्य केले. गावसकर यांचे हे वक्तव्य ऐकून समालोचन कक्षात  लोक हसू लागले. शिमरोन हेटमायरला नुकतीच पुत्ररत्न प्राप्ती झाली. यामुळे तो काही काळ आयपीएल २०२२ मधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मायदेशी गेला होता. यापूर्वी गावसकर यांनी विराट कोहलीसंदर्भात बोलताना अनुष्का शर्माचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद उद्भवला होता.

टॅग्स :सुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज
Open in App