Join us

Shah Rukh Khan on Pat Cummins Batting, IPL 2022 MI vs KKR: Suhana Khan ने विकत घेतलेल्या पॅट कमिन्सने KKRला सामना जिंकवला! त्याची फलंदाजी पाहून शाहरूख म्हणाला...

KKRच्या वतीने सुहाना खान, आर्यन खान यांनी कमिन्सवर लावली होती बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 12:58 IST

Open in App

Shah Rukh Khan on Pat Cummins Batting: IPL 2022 च्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध शानदार विजय नोंदवला. MI vs KKR या सामन्यात KKRचा अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्सने १४ चेंडूत अर्धशतक ठोकून ऐतिहासिक विक्रम केला. विजयानंतर आंद्रे रसेलने कमिन्सच्या भोवती झकास डान्स केला. यंदाच्या लिलावात KKRचा संघमालक बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याची मुलं आर्यन खान (Aryan Khan) आणि सुहाना खान (Suhana Khan) हजर होती. त्यांनी विकत घेतलेल्या पॅट कमिन्सने संघाला दमदार विजय मिळवून दिला. त्यानंतर शाहरूखने खास ट्वीट करून आपल्या भावना जाहीर केल्या.

केकेआर संघाचा मालक शाहरुख खानही पॅट कमिन्सच्या खेळीचा चाहता झाला. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून टीमला संदेश दिला. आंद्रे रसेलने जसा पॅट कमिन्सच्या भोवती डान्स केला, तसाच डान्स करण्याची इच्छा झाल्याचं शाहरूख खानने सांगितले. 'पॅट कमिन्स, मला पण आंद्र रसलसारखा तिथे येऊन डान्स करण्याची इच्छा आहे. तसंच, सर्व खेळाडूंप्रमाणे मलाही तुला या विजयाबद्दल घट्ट मिठी मारायची आहे. कोलकाताला विजयाच्या शुभेच्छा. आणखी काही बोलायला सुचत नाहीये. एकच म्हणतो, 'पॅट' दिये छक्के!!!", असं शाहरूखने ट्वीट केलं.

दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे ४ बाद १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने ५ विकेट्सच्या मोबदल्यात १६२ धावा करून सामना जिंकला. केकेआरचा धडाकेबाज फलंदाज पॅट कमिन्सने येताच सैराट फलंदाजी केली. त्याने १५ चेंडूत झटपट ५६ धावा कुटल्या. या दरम्यान कमिन्सने ६ षटकार आणि ४ चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट ३७३.३३चा होता. तसेच, त्याने आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने डॅनियल सॅम्सच्या एका षटकात ३५ धावा केल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२सुहाना खानशाहरुख खानकोलकाता नाईट रायडर्सबॉलिवूड
Open in App