Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा 'स्पायडर मॅन' झेल; फलंदाजही अवाक्

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. डेव्हिड वॉर्नरच्या त्रिशतकी खेळीनं सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 11:15 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. डेव्हिड वॉर्नरच्या त्रिशतकी खेळीनं सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. पण, सोमवारी ऑस्ट्रेलियातच सुरू असलेल्या एका सामन्यात कांगारूंचा गोलंदाज अ‍ॅस्टन अ‍ॅगरनं स्पायडर मॅन झेल घेतले. त्याच्या याच कॅचची सध्या हवा आहे. ऑस्ट्रेलियात शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि साऊथ ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्यातील हा अफलातून झेल आहे. 

वेस्टर्न ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ठेवलेल्या 345 धावांचा पाठलाग करताना साऊथ ऑस्ट्रेलियाला एका धावेवर पहिला धक्का बसला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियानं पहिला डाव 8 बाद 492 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात साऊथ ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 353 धावाच करता आल्या. वेस्टर्नने दुसरा डावही 6 बाद 205 धावांवर घोषित केल्या. वेस्टर्नकडून शॉन मार्शनं दुसऱ्या डावात 102 धावा चोपल्या. अ‍ॅस्टन अ‍ॅगरनं फलंदाजीतही कमाल दाखवताना नाबाद 45 धावा केल्या. वेस्टर्ननं 6 बाद 205 धावांवर डाव घोषित करताना साऊथसमोर 345 धावांचे आव्हान उभे केले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी साऊथचे हेन्री हंट आणि जॅक वेदरॅल्ड हे मैदानावर उतरले. पहिले षटक खेळून काढल्यानंतर मॅथ्यू केलीनं टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हा अफलातून झेल पाहायला मिळाला. हंटनं पॉईंटच्या दिशेनं मारलेला फटका अ‍ॅस्टन अ‍ॅगरनं पूर्णपणे हवेत झेपावत टिपला. त्याचा हा झेल पाहून हंटही काहीकाळ अवाक् झालेला पाहायला मिळाला.  

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आॅस्ट्रेलिया