Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मिथ, वॉर्नर ठरले सगळ्यात महाग खेळाडू

आठ संघ १०० चेंडूंच्या या पहिल्या स्पर्धेत सहभागी होतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 23:53 IST

Open in App

लंडन : ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे जुलैमध्ये होणाऱ्या ‘द हंड्रेड लीग’च्या सुरुवातीच्या ड्राफ्टमध्ये सर्वात महाग खेळाडू ठरले. स्मिथ आणि वॉर्नर यांची किमत १ लाख २५ हजार पाऊंड आहे.

ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, श्रीलंकेचा लसीथ मलिंगा, दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा हेही याच श्रेणीत आहेत. पहिला लिलाव रविवारी होईल. पुरुषांच्या गटात २३९ परदेशी खेळाडूंसह ५७० खेळाडू सहभागी होतील. आठ संघ १०० चेंडूंच्या या पहिल्या स्पर्धेत सहभागी होतील. ही स्पर्धा १७ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान होईल.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नर