Join us

सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नांत स्टीव्ह स्मिथ कोसळला

लंकेच्या डावात अखेरच्या षटकात महिशा दक्षिणा याने मिडविकेटला हा फटका मारला होता. या घटनेमुळे स्मिथ डोके पकडून बसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 05:43 IST

Open in App

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार स्टीव्ह स्मिथ हा रविवारी श्रीलंकेविरुद्ध टी-२० लढतीदरम्यान क्षेत्ररक्षणाच्या वेळी सीमारेषेवर षटकार रोखण्याच्या प्रयत्नांत जमिनीवर कोसळला. त्याचवेळी त्याचे डोके जमीनीवर आदळल्याने जबर मार लागला.  

लंकेच्या डावात अखेरच्या षटकात महिशा दक्षिणा याने मिडविकेटला हा फटका मारला होता. या घटनेमुळे स्मिथ डोके पकडून बसला. सहकारी कमिन्स आणि मॅक्वेल हे धावत त्याच्याजवळ दाखल झाले. वैद्यकीय पथकाने त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो स्वत: चालत बाहेर गेला. या सामन्यात नंतर सुपर ओव्हर झाला त्यावेळी स्मिथ क्षेत्ररक्षणासाठी आला नव्हता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. त्याआधी आयपीएल लिलावात स्मिथला कुणीही खरेदीदार मिळाला नव्हता. पुढील सहा-सात दिवसांत पुन्हा सराव सुरू करणार आहे. पाकिस्तान दौऱ्याआधी स्मिथ मैदानावर परतणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. 

टॅग्स :स्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियाश्रीलंका
Open in App