जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी ( WTC Final 2023 ) भारतीय संघात काल एक बदल केला गेला. लोकेश राहुल ( KL Rahul) याला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मध्ये दुखापत झाली आणि त्याने WTC Final मधून माघार घेतली. त्याच्या जागी भारतीय संघात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून वृद्धीमान साहाची ( Wriddhiman Saha) निवड केली जाईल अशी चर्चा होती, परंतु BCCI व निवड समितीने युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन याची निवड केली. या निवडीवरून नेटिझन्स व भारतीय चाहतेही नाराज दिसले अन् त्यांनी वृद्धीमान साहासाठी आवाज उठवला. त्यात आज गुजरात टायटन्सच्या सलामीवीराने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.
गौतम गंभीरमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचले; खेळाडूने आभार मानले
KL Rahulला RCBविरुद्धच्या लढतीत दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याला आयपीएलसह WTC Final मधूनही माघार घ्यावी लागली. लखनौ सुपर जायंट्सच्या जयदेव उनाडकत यालाही सरावा दरम्यान त्याच दिवशी दुखापत झाली आणि तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. त्याच्या सहभागाबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. उमेश यादवही दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण, लोकेशच्या जागी संघात इशान किशनला ( Ishan Kishan) संधी देण्याचा निर्णय झाला आहे. केएस भरत हा एकमेव यष्टिरक्षक-फलंदाज संघात आहे आणि त्याला बॅक अप म्हणून इशानची निवड केली गेली आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, इशान किशन; राखीव खेळाडू - ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव