Join us
Daily Top 2Weekly Top 5

Srivalli, Pushpa, Dwayne Bravo: 'श्रीवल्ली' पोहोचली क्रिकेटच्या मैदानात! विकेट घेतल्यावर ब्राव्होने केलं भन्नाट सेलिब्रेशन, 'चॅम्पियन' खेळाडूही झालाय 'पुष्पा'चा फॅन

श्रीवल्ली चं वेड देशभरातच नाही तर भारताबाहेरची असल्याचं स्पष्टच दिसलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 14:45 IST

Open in App

विंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो या कायमच त्याच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. मैदानात आणि मैदानाबाहेर त्याची एक खास शैली त्याने विकसित केली आहे. T20 World Cup 2021 नंतर ब्राव्हो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण तो सोशल मीडियावर कायम अँक्टीव्ह असतो. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या लीग स्पर्धांमध्ये तो अजूनही खेळतोय. अशाच एका लीग सामन्यात ब्राव्होने विकेट घेतल्यानंतर चक्क 'श्रीवल्ली' गाण्याची स्टेप करत सेलिब्रेशन केलं.

बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत कोमिला व्हिक्टोरियन्स आणि फॉर्च्युन बरीशाल या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. ब्राव्होने गोलंदाजी करताना महिदुल इस्लामला आखूड टप्प्याचा चेंडू टाकत जाळ्यात अडकवला. मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. या विकेटचं सेलिब्रेशन करताना ब्राव्होने थेट पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यातील डान्स स्टेप केली आणि अनोखं सेलिब्रेशन केलं.

त्याआधी, घरात असतानाही ब्राव्होने श्रीवल्ली गाण्यावर डान्स करत व्हिडीओ पोस्ट केला होता.

गेल्या काही दिवसांपासून पुष्पा सिनेमा आणि त्याची गाणी तुफान हिट झाली आहेत. चित्रपटातील डायलॉग्स तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत साऱ्यांचाच ओठावर आहेत. श्रीवल्ली आणि सामी सामी ही दोन गाणी इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहेत. अशा वेळी ब्राव्होने केलेल्या अनोख्या विकेट सेलिब्रेशनमुळे हा चित्रपट केवळ देशभरातच नाही तर देशाबाहेरही सुपरहिट झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. 

टॅग्स :पुष्पाड्वेन ब्राव्होअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना
Open in App