Srivalli Dance, Pushpa: 'श्रीवल्ली' गाण्यावर सूर्यकुमार-इशान किशनचा धमाल डान्स; खुद्द अल्लू अर्जुननेही केली कमेंट (Video)

अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील गाणी तुफान हिट झाली असून काही डान्स स्टेप्सदेखील फॅन्सच्या पसंतीस उतरल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 01:30 PM2022-01-17T13:30:22+5:302022-01-17T13:31:06+5:30

Srivalli Dance Viral Video Pushpa Movie Allu Arjun Commented to Cricketers Suryakumar Yadav Ishan Kishan | Srivalli Dance, Pushpa: 'श्रीवल्ली' गाण्यावर सूर्यकुमार-इशान किशनचा धमाल डान्स; खुद्द अल्लू अर्जुननेही केली कमेंट (Video)

Srivalli Dance, Pushpa: 'श्रीवल्ली' गाण्यावर सूर्यकुमार-इशान किशनचा धमाल डान्स; खुद्द अल्लू अर्जुननेही केली कमेंट (Video)

Next

Srivalli Dance Pushpa Movie: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. भारताचा कसोटी मालिकेत २-१ असा पराभव झाला. आता १९ जानेवारीपासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय खेळाडू वन डे मालिकेसाठी आफ्रिकेत पोहोचले आहेत. त्यांचा सरावदेखील सुरू झाला आहे. मात्र मालिकेसाठी तयारी करत असतानाच खेळाडू धमाल मस्तीही करताना दिसत आहेत.

भारताचे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि इशान किशन एका व्हिडीओमध्ये धमाल करताना दिसत आहेत. सध्या साऊथस्टार अलू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य भाषांसह हिंदीतही रिलीज झाल्याने महाराष्ट्रातही या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील काही गाणी आणि त्यावर केलेला डान्सही तुफान व्हायरल होत आहे. सध्या अल्लू अर्जुनने श्रीवल्ली या गाण्यावर केलेली एक डान्स स्टेप लोकांच्या खूप पसंतीस उतरली आहे. टीम इंडियाचे खेळाडूही यातून सुटलेले नाहीत. सूर्यकुमार आणि इशान यांनी अल्लू अर्जुनने केलेल्या डान्स स्टेप्स करण्याचा प्रयत्न केला असून तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

सूर्यकुमार यादवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये सूर्या आणि इशान किशन धमाल करताना दिसत असल्याने अल्लू अर्जूननेही त्यावर कमेंट केली आहे. हसण्याचे तीन इमोजी टाकत त्याने या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

दरम्यान, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन दोघेही वन डे मालिकेत भारतीय संघासाठी महत्त्वाचे खेळाडू असणार आहेत. रोहित शर्मा अद्यापही मालिकेसाठी तंदुरूस्त नसल्याने राहुल आणि विराट कोहलीनंतर अनुभवी खेळाडू म्हणून या दोघांवर संघाच्या फलंदाजीची बरीचशी जबाबदारी असणार आहे.

Web Title: Srivalli Dance Viral Video Pushpa Movie Allu Arjun Commented to Cricketers Suryakumar Yadav Ishan Kishan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app