Join us

पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर

ICC Womens World Cup 2025 Points Table : श्रीलंकेच्या संघानं मॅच न जिंकता उघडले खाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 20:51 IST

Open in App

ICC Womens World Cup 2025 Points Table After SL W vs AUS W 5th Match Abandoned Due To Rain : महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यावर पावसाने पाणी फेरलं.  कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियवर पावसाने केलेल्या 'बॅटिंग'च्या जोरावर भारतासह संयुक्त यजमानपद मिरवणाऱ्या श्रीलंका महिला संघाने यंदाच्या हंगामात आपल्या गुणतालिकेत एक गुण जमा केला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे मिळालेल्या एका गुणासह  ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत ३ गुणांसह टॉपला पोहचला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाकला शह देत टीम इंडियाला नंबर वन होण्याची संधी

कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगणार आहे. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ पकिस्तानविरुद्ध कधीच पराभूत झालेला नाही. हा रेकॉर्ड आणखी भक्कम करत टीम इंडियाला यंदाच्या हंगामातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील गुण तालिकेत नंबर वन होण्याची संधी असेल. सामना पार पडला, तर भारतीय संघ अव्वल स्थान गाठेल हे जवळपास निश्चित आहे.

World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!

 चार संघांनी विजयासह केली यंदाच्या हंगामाची सुरुवात

यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासह श्रीलंकेविरुद्धच्या अनिर्णित सामन्यासह २ सामन्यानंतर आपल्या खात्यात ३ गुण जमा केले असून ते सध्या अव्वलस्थानावर आहेत. याशिवाय  इंग्लंड, बांगलादेश आणि भारत हे तीन संघ असे आहेत ज्यांनी यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. नेट रनरेटच्या जोरावर हे तीन संघ प्रत्येकी २-२ गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

श्रीलंकेच्या संघानं मॅच न जिंकता उघडले खाते

श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघाविरुद्धच्या लढतीनं यंदाच्या स्पर्धेला सुरुवात केली. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २ सामन्यातील एक पराभव अन् ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने सामना न जिंकता एका गुणाची कमाई करत खाते उघडले आहे.  ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या पराभवानंतर अजूनही खाते उघडण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rain helps Sri Lanka open account; India can top by defeating Pakistan.

Web Summary : Rain helped Sri Lanka earn a point in the ICC Women's World Cup 2025. Australia leads with 3 points. India faces Pakistan, with a chance to top the table with a win. England, Bangladesh, and India have won their opening matches.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५आॅस्ट्रेलियाश्रीलंकाभारत विरुद्ध पाकिस्तान