Sri Lanka vs Hong Kong, 8th Match Live Streaming Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेतील आठव्या सामन्यात श्रीलंकेचा संघ हाँगकाँगविरुद्ध यंदाच्या हंगामातील दुसरी लढत खेळणार आहे. श्रीलंकनं संघ कमालीची कामगिरी करत असून त्यांच्यासमोर हाँगकाँगचा निभाव लागणं मुश्किलच आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या डबल हेडरमधील दुसरी लढत दुबई आंतरारष्ट्रीय क्रिकेट स्टेडिमवर रंगणार आहे. हा सामना कुठं अन् किती वाजता पाहता येणार? कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हाँगकाँगचा संघ स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत, पण....
आशिया चषक स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात हाँगकाँगचा संघाने १२ सामने खेळले आहेत. पण अद्याप त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. श्रीलंकेचा संघ 'ब' गटातून अव्वल स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. हा डाव ते अगदी सहज साधतील असे वाटते. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर श्रीलंका संघ यंदाच्या हंगामातील भारतीय संघापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच बेस्ट संघ असल्याची चर्चाही रंगत आहे.
IND vs PAK : ...अन् तो ठरला बुमराहला षटकार मारणारा पहिला पाकिस्तानी; इथं पाहा रेकॉर्ड
कुठं, कधी अन् कसा पाहता येईल SL vs HK यांच्यातील सामना?
श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग यांच्यातील दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात रंगणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री ८ वाजता सुरु होईल. टेलिव्हिजजनवरील स्पोर्ट्स टेन १, सोनी स्पोर्ट्स टेन ३ हिंदी, सोनी स्पोर्ट्स टेन ४ तमिळ, सोनी स्पोर्ट्स टेन ४ तेलुगू आणि सोनी स्पोर्ट्स टेन ५ वर या सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय सोनी Liv App आणि वेबसाइटवर या सामन्याचे Live Streaming उपलब्ध असेल.
दोन्ही संघातील टी-२० मधील पहिली लढत
आशिया कप स्पर्धेतील सामन्यासह श्रीलंका आणि हाँगकाँग यांच्यात टी-२० सामन्याची सुरुवात होत आहे. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन संघ कधीच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसलेले नाहीत.