Sri Lanka vs England 1st T20I Sam Curran Sam Curran Hat Trick : सॅम कुरेन याने श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेलेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात अप्रतिम पुनरागमन करत हॅटट्रिकचा डाव साधला आहे. श्रीलंकेच्या डावातील सुरुवातीच्या एका षटकात त्याने २० धावा खर्च केल्या होत्या. पण त्यानंतर त्याने १६ व्या षटकात श्रीलंकेच्या बॅटरच्या पोटात गोळा आणणारी गोलंदाजी करत हॅटट्रिकचा डाव साधला. ४ धावा खर्च करत त्याने ३ विकेट्स घेत सामना इंग्लंडच्या बाजूने वळवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सॅम कुरेन याने हॅटट्रिकसह घातली खास विक्रमाला गवसणी
कुरेन याने सलग तीन चेंडूंवर दासून शनाका, महीश थीक्षाना आणि मथीशा पाथिराना यांना बाद केले. पावसाच्या व्यत्ययामुळे श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामना प्रत्येकी १७-१७ षटकांचा करण्यात आला होता. डेथ ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवून देताना सॅम कुरेन याने हॅटट्रिकसह खास विक्रमाला गवसणी घातली. इंग्लंडच्या संघाकडून टी-२० सामन्यात हॅटट्रिकचा डाव साधणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी २०२४ च्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध ख्रिस जॉर्डनने ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेणारा कुरेन हा सहावा गोलंदाज आहे.
T20 World Cup 2026 : साखळी फेरीतील ४० सामन्यांसाठी २४ पंच! भारत-पाक सामन्यात कोण पाहणार जबाबदारी?
टी20I मध्ये श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज
- जेकब ओरम (न्यूझीलंड) – २००९
- फहीम अश्रफ (पाकिस्तान) – २०१७-१८
- मोहम्मद हसनैन (पाकिस्तान) – २०१९-२०
- कार्तिक मेयप्पन (यूएई) – २०२२-२३
- लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) – २०२४-२५
- सॅम करन (इंग्लंड) – २०२६
श्रीलंकेनं दमदार सुरुवात केली, पण...नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेला केवळ १३३ धावांत रोखले. यजमान संघाने जोरदार सुरुवात केली होती. कुसल मेंडिसने अवघ्या २० चेंडूंत ३७ धावांची खेळी करत सात षटकांच्या खेळानंतर संघाच्या धावफलकावर ७६ धावा लावल्या होत्या. आदिल रशीद आणि लियाम डॉसन यांनी मिळून पाच विकेट्स घेत सामन्याची दिशा बदलली. जेमी ओव्हर्टननेही दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. १ बाद ७६ धावा अशा मजबूत स्थितीत असणारा श्रीलंका संघाने ९८ धावांवर ६ विकेट्स गमावल्या. सॅम कुरेन याने पहिल्या दोन षटकांत ३४ धावा दिल्या होत्या. पण शेवटच्या षटकात हॅटट्रिकचा डाव साध त्याने आपला स्पेल ३८ धावा खर्च करून संपवला.
Web Summary : Sam Curran's hat-trick propelled England to victory in the first T20I against Sri Lanka. Despite a costly first over, Curran bounced back with a game-changing hat-trick, taking three wickets for just four runs. He became only the second English bowler to achieve this feat in T20Is.
Web Summary : सैम कुरेन की हैट्रिक ने श्रीलंका के खिलाफ पहले टी20I में इंग्लैंड को जीत दिलाई। पहले ओवर में महंगे होने के बावजूद, कुरेन ने शानदार वापसी करते हुए हैट्रिक ली, जिसमें केवल चार रन देकर तीन विकेट लिए। वह टी20I में यह उपलब्धि हासिल करने वाले केवल दूसरे अंग्रेजी गेंदबाज बने।