Snake in Cricket Ground Video, SL vs BAN 1st ODI: क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ मानला जातो. क्रिकेटच्या सामन्यात कधी काय घडेल याचा नेम नाही. असाच एक किस्सा नुकताच घडला. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची सुरुवात २ जुलै रोजी झाली. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात यजमान संघाने शानदार विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली, ज्यामुळे मैदानात उपस्थित सर्वांना धक्का बसला.
मैदानात अचानक शिरला साप
पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार चारिथ असलंकाच्या शानदार शतकामुळे (१०६ धावा) श्रीलंकेने २४४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेशी फलंदाज मैदानात आले. बांगलादेशच्या डावादरम्यान तिसऱ्या षटकात एक साप मैदानात घुसला. त्यामुळे मैदानात प्रचंड गोंधळ उडाला. असिता फर्नांडो गोलंदाजी करत होता. सापाला पाहून सर्वच खेळाडू घाबरले. त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कसा तरी सापाला मैदानाबाहेर हाकलून लावले. सोशल मीडियावर या घटनेची तुफान चर्चा रंगली आहे.
SPL दरम्यान मैदानात घुसला होता साप
गेल्या वर्षी आर. प्रेमदासा स्टेडियमवरच श्रीलंका प्रीमियर लीगच्या काही सामन्यांदरम्यान साप मैदानात घुसला होता. त्यामुळे खेळ काही काळ थांबवावा लागला होता. कोलंबोमध्ये सामन्यांदरम्यान साप मैदानात घुसण्याची ही दुसरी वेळ ठरली.
सामन्यात काय घडलं?
बांगलादेशचा संपूर्ण संघ २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि ३५.५ षटकांत केवळ १६७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. बांगलादेशकडून तन्जीद हसन (६२) आणि झाकीर अली (५१) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. परंतु त्यांना त्यांच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. श्रीलंकेने बांगलादेशचा ७७ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
Web Title: Sri Lanka vs Bangladesh 1st ODI Video viral snake entered colombo cricket ground while live match watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.