SL vs AFG Test: लाईव्ह सामन्यात नव्या पाहुण्याचं आगमन; 'घोरपड' आली अन् सामना थांबला!

SL vs AFG Test Stopped Due to Monitor Lizard: सध्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 04:01 PM2024-02-03T16:01:29+5:302024-02-03T16:01:57+5:30

whatsapp join usJoin us
 Sri Lanka vs Afghanistan Test was delayed for sometime due to Monitor Lizard, watch here video  | SL vs AFG Test: लाईव्ह सामन्यात नव्या पाहुण्याचं आगमन; 'घोरपड' आली अन् सामना थांबला!

SL vs AFG Test: लाईव्ह सामन्यात नव्या पाहुण्याचं आगमन; 'घोरपड' आली अन् सामना थांबला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SL vs AFG Live | कोलंबो: सध्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काही नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यामुळे सामना चांगलाच चर्चेत आला. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ घोरपडीमुळे काही काळ थांबवावा लागला. राजधानी कोलंबोमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी खेळली जात आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात अफगाणिस्तानने १९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान श्रीलंकेने चांगली खेळी करत आघाडी घेतली.

श्रीलंकेसाठी सलामीवीर दिमुथ करुणारत्नेने अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर अँजेलो मॅथ्यूजने शतकी खेळी केली आणि दिनेश चंडिमलने मॅथ्यूजला चांगली साथ दिली. शनिवारी या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा संघ फलंदाजी करत असताना एक विचित्र घटना घडली. यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला.

खरं तर श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ४७ व्या षटकात अफगाणिस्तानचा गोलंदाज निजात अँजेलो मॅथ्यूजला गोलंदाजी करत असताना सीमारेषेजवळ एक घोरपड दिसली. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने घोरपड पाहताच याची माहिती पंचांना दिली. यानंतर काही काळ खेळ थांबवण्यात आला. घोरपड तिथून गेल्यानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झाला.

दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्या डावात केलेल्या १९८ धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेकडून सलामीवीर दिमुथ करुणारत्ने आणि निशान मदुष्का यांनी चांगली सुरुवात करून दिली. मॅथ्यूजने शतक झळकावून पाहुण्या संघाची अडचण वाढवली. 

Web Title:  Sri Lanka vs Afghanistan Test was delayed for sometime due to Monitor Lizard, watch here video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.