टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रत्येक संघ सर्वोत्तम रणनितीसह मैदानात उतरण्याची तयारीला लागला आहे. छोट्या प्रारुपातील क्रिकेटमध्ये मोठा धमाका करण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आणखी एक महत्त्वपूर्ण अन् गेम चेंजर ठरेल, असा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या कोचला श्रीलंकेनं आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करणारा कोच श्रीलंकेच्या ताफ्यात
भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली ७ फेब्रुवारीपासून आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंकेचा संघ या स्पर्धेत 'ब' गटात असून ग्रुप स्टेजमधील सर्व सामने ते घरच्या मैदानावर खेळणार आहेत. श्रीलंकेचा संघ ८ फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्धच्या लढतीसह टी-२० वर्ल्ड कपच्या मोहिमेला सुरुवात करेल. या स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. आता त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेत टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियन कोचवर मोठा डाव खेळला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारे कोच विक्रम राठोड यांना श्रीलंकनं क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
T20 World Cup 2026 New Zealand Squad : न्यूझीलंडने 'या' खास रणनितीसह केली मजबूत संघ बांधणी
भारतीय कोच फक्त टी-२० वर्ल्ड कपसाठी श्रीलंकन संघाला देणार फलंदाजीचे धडे
सध्या विक्रम राठोड आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सहाय्यक प्रशिक्षकाच्या रुपात काम करत आहेत. मात्र, ते केवळ टी २० वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेच्या कोचिंग सेटअपमध्ये सहभागी होणार आहेत. २०२४ च्या गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी विक्रम राठोड हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाने टी-२० वर्ल्ड कपसाठी एक मोठी खेळी खेळल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसत आहे. विक्रम राठोड यांना वर्ल्ड चॅम्पियन कोचचा टॅग लागला असून त्यांना मोठ्या स्पर्धेचा दांडगा अनुभव देखील आहे. याचा श्रीलंकेला कितपत फायदा होणार ते पाहण्याजोगे असेल.
लसिथ मलिंगाही कोचिंग सेटअपचा भाग
टी २० वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने याआधी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने माजी जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा याला गोलंदाजांना मार्गदर्शने देण्यासाठी संघात सामील करून घेतले होते. ४० दिवसांसाठी त्याची गोलंदाज सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी त्याचा करार संपुष्टात येणार आहे.सध्या श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी सलामीवीर सनथ जयसूर्या कार्यरत आहेत. मलिंगा आणि राठोड यांचा समावेश झाल्यामुळे श्रीलंकेचा कोचिंग सेटअप अधिक मजबूत झाला आहे.