SRH vs KXIP Latest News : हैदराबादविरुद्ध ख्रिस गेल मैदानात उतरणार होता, पण...! मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंच्या उत्तरानं वाढवली चिंता

सततच्या पराभवामुळे, बेंचवर असलेल्या ख्रिस गेलची आठवण पंजाबच्या व्यवस्थापनाला आली होती. त्यासाठी गेलला संघात स्थान देण्याचा निर्णयदेखील पंजाबच्या व्यवस्थापनाने घेतला. मात्र सामन्याच्या काही दिवस आधीपासून गेलची प्रकृती बरी नव्हती. (Chris Gayle)

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 22:22 IST2020-10-08T22:21:10+5:302020-10-08T22:22:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
SRH vs KXIP Latest News : Chris Gayle was unable to take the field due to food poisoning against Sunrisers Hyderabad confirms Anil Kumble | SRH vs KXIP Latest News : हैदराबादविरुद्ध ख्रिस गेल मैदानात उतरणार होता, पण...! मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंच्या उत्तरानं वाढवली चिंता

SRH vs KXIP Latest News : हैदराबादविरुद्ध ख्रिस गेल मैदानात उतरणार होता, पण...! मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंच्या उत्तरानं वाढवली चिंता

नवी दिल्ली - सनरायझर्स हैदराबादविरोधात सुरू असलेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबकडूनख्रिस गेल सलामीला खेळणार होता. पण सामन्याच्या काही मिनिटे आधीच आजाराने त्याची ही संधी हिरावून घेतली आहे. गेल याला जेवणातून बाधा झाली आहे. यामुळे  सामन्याच्या काही मिनिटे आधीच त्याला सामन्यातून बाहेर पडावे लागले. पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी याची पुष्टी केली आहे.

सततच्या पराभवामुळे, बेंचवर असलेल्या ख्रिस गेलची आठवण पंजाबच्या व्यवस्थापनाला आली होती. त्यासाठी गेलला संघात स्थान देण्याचा निर्णयदेखील पंजाबच्या व्यवस्थापनाने घेतला. मात्र सामन्याच्या काही दिवस आधीपासून गेलची प्रकृती बरी नव्हती. त्याला सामन्याच्या आधीच फुड पॉयझनिंगचा त्रास होऊ लागला होता. यामुळे त्याला या सामन्यातून बाहेर रहावे लागले आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबने  या सत्रात आतापर्यंत पाच सामन्यांपैकी फक्त एका सामन्यातच विजय मिळवला आहे. के. एल. राहूल आणि मयांक अग्रवाल यांनी आतापर्यंत स्पर्धेत शानदार कामगिरी केली असली तरी पंजाबच्या संघाला फारशी चमकदार कामगिरी अद्याप करता आलेली नाही.

Web Title: SRH vs KXIP Latest News : Chris Gayle was unable to take the field due to food poisoning against Sunrisers Hyderabad confirms Anil Kumble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.