- सौरव गांगुलीभारताने टी-२० मालिका जिंकून इंग्लंड दौऱ्यासाठी पुरेशी तयारी केली आहे. मालिकेतील दुस-या सामन्यात भारत पराभूत झाला तरी अखेरच्या षटकापर्यंत तो सामना रंगतदार ठरला होता. हा आत्मविश्वास आणि विजयाची भूक वन डे मालिकेसाठी उपयुक्त ठरणार आहे. टी-२० सारख्या प्रकारात भारताचा खेळ उंचावला आहे. इंग्लंडविरुद्ध विराट आणि सहकाºयांनी जी चुणूक दाखविली त्यातून हे सिद्ध झाले. हा संघ कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही देशात विजय मिळविण्याइतपत सक्षम झाला आहे.मी गेल्या २०-२२ वर्षांपासून नियमितपणे इंग्लंडला दरवर्षी जातो. यंदाच्या उन्हाळ्यापेक्षा वेगळे वातावरण कधीही अनुभवले नाही. उष्ण वातावरण होतेच शिवाय दमटपणाही होता. भारतात खेळल्यासारखेच तेथेही वाटत होते. खेळपट्टी टणक तसेच फलंदाजांना पूरक होती. अशावेळी फिरकीपटू मारा करताना आनंदी असतात. या मालिकेत भारतीय फिरकीपटूंचा सामना करताना इंग्लंडच्या नाकीनऊ येणार आहेत. मालिकेत फिरकीपटू निर्णायक ठरतील. इंग्लंडमध्ये इंग्लंड संघ प्रतिस्पर्ध्यांसाठी ‘बाप’ ठरतो,पण भारतीय संघ त्यांना धूळ चारू शकतो.उभय संघांकडे भक्कम फलंदाजी असली तरी माझ्यामते विराटचा संघ काकणभर सरस ठरतो. भारतीय मारा देखील इंग्लंडच्या तुलनेत भेदक वाटत आहे. उमेशचा सातत्यपूर्ण मारा आणि कुलदीप-चहल यांची फिरकी इंग्लंडसाठी पुरेशी आहे. त्याचवेळी तिसºया टी-२० त कुलदीपला विश्रांती देण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय मला आश्चर्यकारक वाटला.हार्दिक, रोहित आणि लोकेश राहुल यांचेही कौतुक झाले पाहिजे. रोहितची फटकेबाजी अप्रतिम आहे. टी-२० सारख्या प्रकारात भारताचा तो ‘मॅचविनर’ आहेच. राहुलवर विश्वास दाखविणा-या विराटला देखील श्रेय द्यावे लागेल. भविष्यातील खेळाडू म्हणून संधी मिळण्याचा राहुल हकदार आहे. निधड्या छातीचा खेळाडू या नात्याने हार्दिक हा फलंदाजी आणि गोलंदाजी यात साधर्म्य राखण्यात संघाला उपयुक्त ठरतो. भारताच्या दीर्घकालीन इंग्लंड दौ-याला आताकुठे सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा मारा न सुधारल्यास यंदाच्या मोसमात भारताला पाठोपाठ विजय साजरे करता येतील, असा विश्वास वाटतो. (गेम प्लॅन)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- फिरकीपटू निर्णायक ठरतील
फिरकीपटू निर्णायक ठरतील
भारताने टी-२० मालिका जिंकून इंग्लंड दौऱ्यासाठी पुरेशी तयारी केली आहे. मालिकेतील दुस-या सामन्यात भारत पराभूत झाला तरी अखेरच्या षटकापर्यंत तो सामना रंगतदार ठरला होता. हा आत्मविश्वास आणि विजयाची भूक वन डे मालिकेसाठी उपयुक्त ठरणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 00:56 IST