Join us
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषकाच्या संघातून डच्चू मिळाल्यावर अजिंक्य राहणेने केली होती 'ही' स्पेशल गोष्ट

विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्यावर रहाणे खचून गेला नाही, तर त्याने एक खास गोष्ट केली. या गोष्टीचा फायदा अजिंक्यला झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 19:46 IST

Open in App
ठळक मुद्देअजिंक्यने घेतली होती महान क्रिकेटपटूची भेट

मुंबई : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात अजिंक्य रहाणेला स्थान देण्यात आले नव्हते. हे अजिंक्यसाठी धक्कादायक होते. कारण इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याचा चांगला अनुभव अजिंक्यला होता. पण विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्यावर रहाणे खचून गेला नाही, तर त्याने एक खास गोष्ट केली. या गोष्टीचा फायदा अजिंक्यला झाला.

अजिंक्य म्हणाला की, " तुम्ही काही वेळा यशाच्या मागे धावत राहता. जेव्हा तुम्हाला यश मिळत असते तोपर्यंत सारे आलबेल असते, पण या धावपळीत तुम्ही काही गोष्टींपासून लांब राहता. काही गोष्टी तुम्हाला करता येत नाहीत. माझ्यामते थोडा वेळ थांबून तुम्हाला आत्मपरीक्षण करणेही गरजेचे असते. जेव्हा तुम्हाला अपयश येते तेव्हा आत्मपरीक्षण करणे गरजेचे असते. जेव्हा माझी विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले नाही तेव्हा मी निराश झालो नाही."

अजिंक्य हा भारताच्या कसोटी संघाचा भाग आहे. पण त्याला एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघापासून लांब ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा अजिंक्य कुठेही दिसत नव्हता. त्यावेळी अजिंक्य नेमका कुठे होता...

अजिंक्य याबाबत म्हणाला की, " जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला होता, तेव्हा मी इंग्लंडमध्ये होते. या काळात इंग्लंडमध्ये मी कौंटी क्रिकेट खेळत होतो. इंग्लंडमध्ये मी दोन महिन्यांत सात सामने खेळलो. या दोन महिन्यांमध्ये मला बरेच काही शिकता आले. एक खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणूनही मला चांगल्या गोष्टी शिकता आल्या."

अजिंक्यने घेतली होती महान क्रिकेटपटूची भेट

अजिंक्यने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी एका महान क्रिकेटपटूची भेट घेतली होती. याबाबत अजिंक्य म्हणाला की, " मी काही दिवसांपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची भेट घेतली होती. द्रविड यांनी मला फलंदाजीबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा मला चांगलाच फायदा झाला."

टॅग्स :अजिंक्य रहाणेराहूल द्रविड