विराट कोहलीने ( Virat Kohli) हा वन डे वर्ल्ड कप गाजवला... वर्ल्ड कप इतिहासात एकाच पर्वात ७०० हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज ठरला... सचिन तेंडुलकचा वन डेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम विराटने पन्नासावे शतक झळकावून तोडला.. त्याची फिटनेस ही अनेकांना थक्क करणारी व प्रेरणा देणारी ठरतेय... पण, सध्या विराटच्या कामगिरीसह त्याच्या मनगटावर दिसणारे डिव्हाईस चर्चेचा विषय ठरतेय... हे उपकरण घड्याळासारखे दिसत असले तरी त्याचे फिचर्स भन्नाट आहेत.
काळ्या बँडसारखे दिसणारे उपकरण फिटनेस बँड. हा फिटनेस बँड खूप खास आहे आणि तो अद्याप भारतात लाँच झालेला नाही. ब्रँडचे नाव द हूप आहे. २०१५ मध्ये या ब्रँडचे सीईओ विल अहमद यांनी त्यांचे पहिले डिव्हाइस लॉन्च केले होते. विराटकडे या बँडची चौथी आवृत्ती आहे. २० हजार रुपयांच्या या बँडसाठई तुम्हाला काही किंमत मोजून सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल आणि तेही एका महिन्यासाठी. म्हणजे, एका महिन्यासाठी पैसे द्या आणि नंतर तो बँड वापरा. त्यामुळे हा बँड अधिक खास बनतो. या बँडच्या मदतीने तुम्ही तुमच्या झोपेचा कालावधी ठरवू शकता. त्याच वेळी, ते तुमची ऑक्सिजन पातळी, तुम्ही किती कॅलरीज बर्न केल्या आणि तापमान काय आहे याबद्दल सांगते.
विराट कोहली त्याच्या फिटनेसची किती काळजी घेतो हे प्रत्येक चाहत्याला माहीत आहे आणि हा बँड त्याला खूप मदत करतो. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने ऑस्टेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगला ( १३७०४) मागे टाकले. सचिन तेंडुलकर ( १८४२६) व कुमार संगकारा ( १४२३४) हे दोनच पलंदाज आता विराटच्या पुढे आहेत.