सगळ्या बॉलर्संना चोपलं, पण सहकाऱ्यानं केला घात; N. Jagadeesan चं तिसरं द्विशतक फक्त ३ धावांनी हुकलं

जोडी जमलीये असे वाटत असताना गडबड घोटाळा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:49 IST2025-09-05T14:46:34+5:302025-09-05T14:49:08+5:30

whatsapp join usJoin us
South Zone's N Jagadeesan Misses Out Double Century After Being Run Out By Nishant Sindhu Duleep Trophy Semifinal Against North Zone In Bengaluru | सगळ्या बॉलर्संना चोपलं, पण सहकाऱ्यानं केला घात; N. Jagadeesan चं तिसरं द्विशतक फक्त ३ धावांनी हुकलं

सगळ्या बॉलर्संना चोपलं, पण सहकाऱ्यानं केला घात; N. Jagadeesan चं तिसरं द्विशतक फक्त ३ धावांनी हुकलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

N. Jagadeesan Misses Out Double Century After Being Run Out : दुलीप करंडक स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण विभाग संघाच्या ताफ्यातून एन. जगदीशन याने क्लास बॅटिंग केली. दुसऱ्या दिवशी १४८ धावांवरून खेळायला सुरुवात केल्यावर त्याची विकेट कोणी घेऊ शकेल, असे अजिबात वाटत नव्हते. पण शेवटी आपल्याच संघातील सहकाऱ्यासोबतचा ताळमेळातील अभावामुळे तो फसला अन् द्विशतकाच्या उंबरठ्यावर त्याने आपली विकेट गमावली. धावबादची संधी मिळाल्यावर कोणतीही चूक न करता निशांत संधूनं त्याला तंबूत धाडण्याचा डाव साधला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जोडी जमलीये असे वाटत असताना गडबड घोटाळा झाला

कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या रुपात दक्षिण विभाग संघाला २९८ धावांवर चौथा धक्का बसला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रिकी भुई आणि नारायण जगदीशन जोडी जमली. दोघांनी अर्धशतकी भागीदारीचा पल्ला पार करुन ८७ धावांचा आकडा गाठला होता. पण दक्षिण विभाग संघाच्या डावातील ८१ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दोघांच्यातील ताळमेळाचा अभाव दिसून आला. ज्याची किंमत जगदीशनला आपल्या विकेट्सच्या रुपात मोजावी लागली.

रिकी भुईचा नकार अन् जगदीशनची नाराजी

 रिकी भुईनं पॉइंटच्या दिशेनं चेंडू खेळल्यावर स्ट्राइक एन्डवर असलेल्या जगदीशन याने एका धावेसाठी कॉल केला. पहिल्यांदा रिकी भुईन त्याला होकार दिला. पण निशांत संधू वेगाने चेंडूवर येतोय हे पाहिल्यावर त्याने धाव घेण्याचा इरादा बदलला. जगदीशन माग वळून पुन्हा नॉन स्ट्राइक एन्डला धावला. पण संधूनं गोलंदाज डांगरकडे अगदी योग्य थ्रो करत विकेटचा डाव साधला. विकेट गमावल्यावर जगदीशन याने आपल्या सहकाऱ्यावर नाराजी व्यक्त केल्याचेही दिसून आले. 

तिसरं द्विशतक फक्त ३ धावांनी हुकलं

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एन जगदीशन याने आतापर्यंत दोन द्विशतके झळकावली आहेत. ३२१ ही त्याची प्रथम श्रेणीतील सर्वोच्च कामगिरी आहे. २०२४ च्या रणजी करंडक स्पर्धेत त्याने चंदीगड विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली होती. उत्तर विभाग संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने ३५२ चेंडूचा सामना करताना १६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १९७ धावांची खेळी केली. जगदीशन याने प्रथम श्रेणीतील तिसरे द्विशतक अवघ्या ३ धावांनी हुकले.

Web Title: South Zone's N Jagadeesan Misses Out Double Century After Being Run Out By Nishant Sindhu Duleep Trophy Semifinal Against North Zone In Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.