Join us

Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...

स्टार खेळाडूंसाठी BCCI नं दक्षिण विभाग संघाला पाठवला होता ई-मेल; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:01 IST

Open in App

दुलीप करंडक ट्रॉफी स्पर्धेसह देशांतर्गत हंगामाला सुरुवात होतीये. या स्पर्धेत मोहम्मद सिराजसह केएल राहुलसारख्या स्टार खेळाडूंना संघात घ्या, असे आदेश बीसीसीआयकडून दक्षिण विभाग संघाला देण्यात आले होते. पण बीसीसीआयने पुढाकार घेऊनही टीम इंडियातील स्टार खेळाडूंना या संघात स्थान मिळणं कठीण झाले आहे. दक्षिण विभाग संघात तिलक वर्मा हा एकमेव असा खेळाडू आहे जो बीसीसीआयशी करारबद्ध आहे. जो दुलिप करंडक स्पर्धत या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

स्टार खेळाडूंसाठी BCCI नं दक्षिण विभाग संघाला पाठवला होता ई-मेल

दुलीप करंडक स्पर्धेसाठीच्या दक्षिण विभाग संघात टीम इंडियातील करारबद्ध खेळाडूंना सामील करून घ्या, असा ईमेल बीसीसीआयने राज्य क्रिकेट असोसिएशनला पाठवला होता. या यादीतील खेळाडूंमध्ये  इंग्लंड दौऱा गाजवणारा मोहम्मद सिराज, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, साई सुदर्शन आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश होता. पण BCCI नं जोर लावूनही या खेळाडूंना द देशांतर्गत स्पर्धेतील दक्षिण विभाग संघात स्थान मिळणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. 

सिक्सर किंग युवीचा चेला पांड्या अन् सूर्या पेक्षा भारी! ९ चेंडूत एक षटकार मारतोच; इथं पाहा रेकॉर्ड

करारबद्ध खेळाडूंसाठी रणजी अनिवार्य करा

राष्ट्रीय निवडकर्त्यांनी विभागीय संघाच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करु नये, असे दक्षिण विभाग संघाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जर बीसीसीआयला करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग निश्चित करायचा असेल तर त्यासाठी या खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धेत खेळणं अनिवार्य करा. दुलीप ट्रॉफी स्पर्धा ही रणजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी आहे. ते तसेच राहायला हवे,  अशी भूमिका विभागीय क्रिकेट संघटनेकडून मांडण्यात आली आहे. संघाशी संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

स्टार खेळाडूंसाठी चांगली कामगिरी करणाऱ्यांना बाहेर बसवता येणार नाही 

क्रिकबझनं दक्षिण विभाग संघाशी संबंधित एका अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, केरळच्या संघाने इतिहासात पहिल्यांदा रणजी करंडक स्पर्धेची फायनल गाठली. संघाच्या पदरी पराभव पडला असला तरी अंतिम सामना रंगत झाला. केरळच्या संघाकडून ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीये, त्यांना दुलीप करंडक स्पर्धेत संधी मिळालीच पाहिजे. भारतीय संघातील स्टार खेळाडूंना जागा करताना  केरळचे बहुतांश खेळाडू संघाबाहेर राहिले असते. 

दक्षिण विभाग संघात कोणत्या राज्यातील किती खेळाडू?

दुलीप करंडक स्पर्धेसाठी दक्षिण विभाग संघाने २६ जुलै रोजी तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यी संघाची घोषणा केली होती. सर्वाधिक ४ खेळाडू हे केरळचे आहेत. हैदराबादच्या ३ खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे. आंध्र आणि तमिळनाडू आणि कर्नाटकचे प्रत्येकी २-२ तर पुड्डुचेरी आणि गोवा संघातील प्रत्येकी एका खेळाडूला संधी देण्यात आली आहे. 

टॅग्स :बीसीसीआयमोहम्मद सिराजलोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघवॉशिंग्टन सुंदर