Join us

अजब-गजब : संपूर्ण संघाच्या धावा दहा, त्यात अतिरिक्त सहा

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात नीचांक धावसंख्या किती असेल 40, 45, 55... पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 13:16 IST

Open in App

सिडनी : ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात नीचांक धावसंख्या किती असेल 40, 45, 55... पण बुधवारी एक असा लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटमध्ये संपूर्ण संघ 10 धावांत माघारी परतण्याची घटना बुधवारी घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दहा धावांमध्ये सहा अतिरिक्त धावांचा समावेश होता.

National Indigenous Cricket Championship स्पर्धेतील या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाचा संघ 10 धावांत तंबूत परतला. त्यात सलामीवीर फेबी मॅन्सेलने सर्वाधिक चार धावा केल्या, तर उर्वरित 10 फलंदाज भोपळा न फोडता माघारी परतले. न्यू साऊथ वेल्सच्या रोक्साने व्हॅन-व्हीनने एका धावेत पाच फलंदाज माघारी पाठवले. नाओमी वूड्सने दोन चेंडूंत दोन विकेट घेतल्या. दक्षिण ऑस्ट्रेलिया संघांचा संपूर्ण डाव केवळ 62 चेंडूंत गडगडला. न्यू साऊथ वेल्सहे हा सामना 15 चेंडूंत जिंकला.  

टॅग्स :आॅस्ट्रेलिया