लंडन : दक्षिण आफ्रिका संघाने २७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावून ‘चोकर्स’चा डाग पुसला. या संघाने शनिवारी ऐतिहासिक लॉर्ड्सवर सध्याचा विजेता ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. १९९८ ला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून हा संघ कसोटीत पहिल्यांदाच चॅम्पियन बनला आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी २८२ धावांचे लक्ष्य त्यांनी पाच गड्यांच्या मोबदल्यात गाठले. सामनावीर एडेन मार्करामने १३६ आणि कर्णधार तेम्बा बावूमाने ६६ धावांचे योगदान दिले. त्याआधी, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २१८ धावा करीत द. आफ्रिकेला २८२ धावांचे लक्ष्य दिले होते. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने २१२ अशी मजल गाठली.
सलामीवीर एडेन मार्करामचे शानदार शतक, तसेच कर्णधार तेम्बा बावुमाच्या अर्धशतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघाने अखेर 'चोकर्स'चा डाग पुसून काढताना शनिवारी ऐतिहासिक लॉईसवर कसोटीचे विश्वविजेतेपद पटकावले, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला सव्वातीन दिवसांत ५ गड्यांनी पराभूत केले. या विजयासह बावुभाच्या संधाने २७ वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपविला.
दक्षिण आफ्रिकेने १९९८ नंतर पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेने जिंकली होती. दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीसी चॅम्पियनशिप जिंकणारा तिसरा संघ ठरला. यापूर्वी २०२१ मध्ये न्यूझीलंडने आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६९ धावांचीच गरज होती, तर ऑस्ट्रेलियाला ८ बळी मिळविण्याची, चौथ्या डावात २८२ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते.
दक्षिण आफ्रिकेने ८३.४ षटकांत पाच गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य सहज गाठले. यात एडेन मार्कराम आणि तेम्बा बायुमा यांचे मोलाचे योगदान राहिले, तिसऱ्याच षटकात रायन रिकल्टनला ६ धावांवर मिचेल स्टार्कने याद केले; पण नंतर सलामीवीर मार्करामला विआन मुल्डरने चांगली साथ दिली. त्यामुळे त्यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली; पण मुल्डरलाही २७धावांवर स्टार्कनेच बाद केले.
मार्करामला साथ देणाऱ्या बावुमाला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत असतानाही त्याने मैदानात फलंदाजीला प्राधान्य दिले. दोघांनी १४७ धावांची भागीदारी करीत दक्षिण आफ्रिकेचा विजय दृष्टिपथात आणला होता. चौथ्या दिवशी पॅट कमिन्सने बावुमाला ६६ धावांवर बाद केले. विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज असताना मार्करामला जोश हेजलवूडने झेलबाद केले, मार्करामने २०७ चेंडूत १४ चौकारांसह १३६ धावांचे योगदान दिले. डेव्हिड वेडिंगहॅम आणि काईल वेरियन यांनी संधाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.